पुणे

कोरेगाव पार्क परिसरात उन्हाचा चटका वाढला - उपनगरातील पारा ४० अंशावर

CD

पुणे, ता. १८ : शहर आणि परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत होती. मात्र मंगळवारी (ता. १८) कोरेगाव पार्क परिसरामध्ये ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे उपनगरांमध्ये उन्हाचा चटका वाढला आहे. दरम्यान शहरामध्ये शिवाजीनगर परिसरात ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होताना दिसत आहेत. कमाल आणि किमान तापमानामध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. बदलत्या वातावरणामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या दिवसापासून शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात कमी-अधिक वाढ होत असल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात काही अंशी घट झाली होती. मात्र, मंगळवारी कोरेगाव पार्क, लोहगाव आणि मगरपट्टा परिसरामध्ये कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली. त्यामुळे या सर्व भागातील कमाल तापमान ४० अंशाच्या पुढे नोंदविले गेले.
पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. १९) कमाल तापमान स्थिर राहून ३८ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान १७ अंश सेल्सिअस नोंदवले जाईल. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी (ता. २०) कमाल तापमानात किंचित घट होऊन ते ३७ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल तर किमान तापमानामध्ये वाढ होऊन ते १९ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल. दुपारी किंवा सायंकाळी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT