पुणे

बेकायदा गॅस सिलिंडर भरणाऱ्यास हांडेवाडीतून अटक

CD

पुणे, ता. १८ : घरगुती गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या लहान सिलिंडरमध्ये गॅस भरून त्याची विक्री करणाऱ्या तरुणाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. हडपसरमधील हांडेवाडी परिसरातून ८० सिलिंडरसह इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

विक्रांत राजकुमार जाधव (वय २२, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हांडेवाडी रस्त्यावरील एका सोसायटीसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरमधून दुसऱ्या लहान सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरण्यात येत असल्याची माहिती पोलिस अंमलदार अतुल पंधरकर यांना मिळाली. ही बाब त्यांनी वरिष्ठांना कळवली.
पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त धन्यकुमार गोडसे, काळेपडळ ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहाय्यक निरीक्षक अमित शेटे, पोलिस अंमलदार प्रवीण काळभोर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी यांच्या पथकाने त्याठिकाणी मंगळवारी (ता. १८) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.
-------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT