पुणे

वास्तुशास्त्र नियोजनाविषयी कार्यशाळा

CD

वास्तुशास्त्रानुसार घर, ऑफिस वा दुकान कसे असावे आदींबाबत माहिती करून देणारी ऑनलाइन कार्यशाळा ८ सप्टेंबरपासून आयोजिली आहे. घर-वास्तू दोषमुक्त असावी ही इच्छा बाळगणाऱ्या सर्वांसाठी ही कार्यशाळा उपयुक्त आहे. कार्यशाळेत वास्तुशास्त्र काय आहे, वास्तुदोष कोणते आहेत, त्याचे परिणाम कोणाला जाणवतात, दिशा, उपदिशा, अधिपती देवता आणि पंचतत्व, दिशा आणि प्रभाव, वास्तुपुरुष मंडल, मर्मस्थान, उपमर्मस्थान, जमीन कशी निवडावी, घर नक्की कोठे व कसे बांधले पाहिजे, घर बांधण्यास प्रारंभ कसा करावा, घरातील अंतर्गत रचना कशी असावी, मुख्य दरवाजाची दिशा ओळखणे, दरवाजा कोठे करावा, वास्तुचे आयुष्य आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

व्यावसायिक हायड्रोपोनिक्स भाजीपाला
व्यावसायिकदृष्ट्या आधुनिक हायड्रोपोनिक तंत्राने भाजीपाल्याची शेती करून दर्जेदार गुणवत्तेचे उत्पादन कसे मिळवावे, पायलट बेसिसवर हा प्रयोग कसा करावा आदींविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाची ओळख, आवश्यक साधने व फर्टीगेशन, पाण्याची गुणवत्ता व आवश्यक अन्नद्रव्ये, देशी-विदेशी भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, औषधी वनस्पती आदी प्रकारचा भाजीपाला कसा पिकवावा, घरच्या घरी हायड्रोपोनिक युनिट अथवा गार्डन कसे उभारावे, हायड्रोपोनिकसाठी रोपे कशी तयार करावी, न्यूट्रियंट सोल्यूशन कसे तयार करावे, सामू, प्रकाश, आर्द्रता, तापमान यांचे महत्त्व, अन्नद्रव्यांची कमतरता व उपाय आदींविषयी सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाइल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबर रोजी आयोजिली आहे. यात सुमारे दहा प्रकारचे मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकविले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. यामध्ये पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मसाले प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, उपलब्ध असणारी बाजारपेठ, मार्केटिंग करण्याच्या पद्धती, मसाला व्यवसायासाठी लागणारी जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणाऱ्या मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune ZP Election : जिल्ह्यात सात ठिकाणी महिलाराज; बारामती, हवेली, आंबेगावात सभापतिपदासाठी होणार चुरस

राम चरणच्या ‘पेड्डी’ चित्रपटाच्या पुढच्या शेड्यूलची पुण्यात आज सुरुवात, ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार!

Latest Marathi News Live Update : पुण्यात पीएमपीएमएलचा नवा उपक्रम; बसमध्येच फिरते वाचनालय

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT