पुणे, ता. २५ : गणेश प्रतिष्ठापना व मुर्ती खरेदी निमित्त शहरात भाविक व मंडळांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतुकीची सोय सुरळीत राहण्यासाठी वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले आहे. त्यानुसार २५ ते २७ ऑगस्टदरम्यान शहरातील डेंगळे पूल, पेठांचा भाग, सिंहगड रस्ता, केशवनगर व मुंढवा परिसरातील काही मार्गांवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
शिवाजी महाराज रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक वाहतुकीस बंद असेल. वाहनांना संताजी घोरपडे पथावरून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे वळविण्यात येईल. झाशीची राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूल मार्गे कुंभारवाडयाकडे जाणाऱ्या वाहनांना शिवाजी महाराज पुलामार्गे जावे लागेल. सिंहगड रस्त्यावर सावरकर पुतळा चौक ते समाधान भेळ सेंटर या मार्गांवर रस्त्यालगत वाहने लावण्यास मनाई असून पार्किंग व्यवस्था मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा, नीलायम ब्रीज येथे असेल.
दरम्यान, काही महत्त्वाचे रस्ते जसे की फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज तसेच अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक, मोती चौक त्याचबरोबर मंगला टॉकीज समोरील रस्ता या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी असेल. केशवनगर, मुंढवा परिसरातही मंगळवारी (ता. २६) वाहतुकीत बदल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, गायत्री माता मंदिर, रेणुका माता मंदिर परिसरातून जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल.
पीएमपी बसेससाठी मार्ग
१) शिवाजीनगर बसस्थानकावरून शिवाजी महाराज रस्त्याने स्वारगेटला जाणाऱ्या बस स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्ता व टिळक रस्त्याने स्वारगेटला जातील.
२) महापालिका बसस्थानकावरून स्वारगेटला जाणाऱ्या बस जंगली महाराज रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्ता, शास्त्री रस्त्याने स्वारगेटला जातील.
येथे पार्किंग व्यवस्था...
- कामगार पुतळा चौक ते शिवाजी महाराज पुतळा
- संताजी घोरपडे पथ ते गाडगीळ पुतळा
- टिळक पूल ते भिडे पुलादरम्यान नदीपात्रातील रस्ता
- मंडई येथील मिनव्हा, आयर्न पार्किंग तळ
- शाहू चौक ते राष्ट्रभूषण चौक
मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद
गणेशोत्सवात नागरिकांची साहित्य खरेदी व देखावे पाहण्यासाठी मोठया प्रमाणात गर्दी होत असते. सुरक्षिततेच्या उपाययोजना म्हणून शहरातील मध्यवर्ती भागात वाहतूक शाखेकडून जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २५ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान गणेश विसर्जन होईपर्यंत असेल. यामध्ये सेनादत्त पोलिस चौकी ते अलका चौकादरम्यान शास्त्री रस्ता, जेधे चौक ते अलका चौक टिळक रस्ता, शनिपार ते अलका चौकादरम्यान कुमठेकर रस्ता, संत कबीर चौक ते अलका चौकादरम्यान लक्ष्मी रस्ता, फुटका बुरूज ते अलका चौकादरम्यान केळकर रस्ता, गाडीतळ पुतळा ते जेधे चौक शिवाजी महाराज रस्ता, नळस्टॉप चौक ते खंडोजीबाबा चौक कर्वे रस्ता, खंडोजीबाबा चौक ते वीर चाफेकर चौक नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, जंगली महाराज रस्ता, राजाराम ब्रीज ते सावरकर चौक सिंहगड रस्ता, तर पॉवर हाउस ते दारूवाला पूल, जिजामाता चौक ते फुटका बुरूज चौक गणेश रस्ता या रस्त्यांवर जड व अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
वाहनचालकांनी अनावश्यक वाहनांचा वापर टाळावा, शक्यतो सार्वजनिक वाहतूक व शेअरिंगचा वापर करावा. तसेच मंडप व विसर्जन मिरवणुकीसाठी येणाऱ्या वाहनांसाठी वेगळी पार्किंग व्यवस्था केली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.
- हिंमत जाधव,
पोलिस उपायुक्त, शहर वाहतूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.