पुणे

जुन्या इमारतींचा पुनर्विकास

CD

पुणे, ता. २७ : यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट) सुरू आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलिटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा ३१ ऑगस्टला आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रिडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे, असे सर्व जण रिअल इस्टेट एजंटसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

व्यावसायिक मसाले कार्यशाळा
घरगुती चवीचे झणझणीत कोल्हापूर स्टाइल मसाले प्रात्यक्षिकासह शिकवणारी कार्यशाळा १३ व १४ सप्टेंबरला आयोजिली आहे. यात १० प्रकारचे मसाले प्रत्यक्ष तयार करून शिकविले जातील. त्याच्या नोट्स पुरवल्या जातील. यामध्ये पहिल्या दिवशी बिर्याणी, चिकन, मटण, चाट, किचन किंग, मालवणी कोकणी, काळा, कोल्हापुरी कांदा लसूण, मिसळ, गोडा, पेरी पेरी, गरम इत्यादी मसाले प्रात्यक्षिकासह शिकवले जातील. दुसऱ्या दिवशी मसाला व्यवसाय उभे करण्यासाठी लागणारे भांडवल, कच्च्या मालाची खरेदी व उपलब्धता, मसाला व्यवसायाला असणारी मागणी व त्याचे स्वरूप, बाजारपेठ, मार्केटिंगच्या पद्धती, जागा, प्रोजेक्ट रिपोर्ट, मशिनरी, कॉस्टिंग आदींविषयी माहिती दिली जाईल.
संपर्क : ८४८४८११५४४

शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे १० दिवस चालणारे ऑनलाइन प्रशिक्षण १५ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यात विविध विभागांतील नोंदणी, न दिसणाऱ्या निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटल सही, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, स्वतःकडे यंत्रे व साहित्य नसतील तर करावयाचे भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या, याबाबत सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

लँडस्केप डिझाइनिंग अभ्यासक्रम
विमानतळ, शहरातील रस्ते, चौक, व्यावसायिक ठिकाणे, हॉटेल्स, उद्याने, रहिवासी सहकारी गृहनिर्माण संस्थांचा परिसर इथपासून ते घराचा एखादा छोटासा कोपरा जिवंतपणे सुशोभित करण्यासाठी ‘लँडस्केप प्लॅनिंग व डिझायनिंग या विषयातील कौशल्य आत्मसात करून त्यात करिअर करण्याला भरपूर वाव आहे. या पार्श्वभूमीवर या अभ्यासक्रमाची रचना विद्यार्थी तसेच नोकरी करणारा वर्ग, आर्किटेक्चर पदवीधर, स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर त्याचबरोबर लँडस्केप कन्सल्टंट यांना डोळ्यांसमोर ठेवून केली आहे. यामध्ये झाडे-झुडुपे, वेलींचा लँडस्केपिंगसाठी शास्त्रीयदृष्ट्या वापर, मियावाकी प्लांटेशन पद्धतीचे महत्त्व, रस्ते, उद्याने, मोकळ्या जागेत लँडस्केप नियोजन, लँडस्केपसाठी बांधकाम रचना, नियोजन, साइट प्लॅनिंग व लँडस्केप प्रोजेक्ट डिझायनिंग, लँडस्केपिंगसाठी अंदाजे खर्चाचे नियोजन, ऑटोकॅड सॉफ्टवेअर, पर्यावरणीय आणि कायदेशीर पैलू, औद्योगिक क्षेत्रातील जैवविविधता व तेथील प्लांटेशनचे नियम आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ९८८१०९९४२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil : तिन्ही गॅझेटमध्ये वैयक्तिक माहिती नाही; जरांगे यांची मागणी निरर्थक असल्याचे मत

USA School Shooting : अमेरिकेतील शाळेत भयानक गोळीबार! तीनजण ठार, २० जखमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी न होणाऱ्यावर गावकऱ्यांची नजर

Stamp Duty: राज्य सरकारची मोठी घोषणा! पीएम आवास योजनेतील घरे आणि लहान निवासी भूखंडांवरील मुद्रांक शुल्क माफ

Maratha Morcha : मराठा मोर्चामुळे तळेगाव-चाकण राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक गुरुवारी बंद

SCROLL FOR NEXT