पुणे

भूमी अभिलेख विभागाकडून चॅटबॉट सुविधा सुरू

CD

पुणे, ता. २७ ः भूमी अभिलेख व्यवस्थापन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी महसूल विभागाने तंत्रज्ञानाचा वापर करून ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ‘भूमित्र’ या चॅटबॉट सेवेची सुरुवात केली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या सेवेचे उद्‍घाटन करण्यात आले. ‘महाभूमी’ संकेतस्थळावर ७/१२, ८-अ, ई-चावडी, ई-हक्क, फेरफार अर्ज स्थिती, पीक पाहणी आणि महा भू-नकाशा यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. तसेच, नागरिक या संकेतस्थळावर ७/१२ पाहू शकतात, ७/१२ डिजिटल स्वाक्षरी केलेला मिळवू शकतात आणि फेरफार अर्जाची स्थिती तपासू शकतात. डिमिस्टिफायिंग लँड रेकॉर्ड्‌स’ (भूमी अभिलेखांचे गूढ उकलणे) या संकल्पनेअंतर्गत ही ‘भूमित्र’ चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा माहिती, सुविधा आणि सूचना या तीन तत्त्वांवर आधारित आहे. ‘भूमित्र’ चॅटबॉटमध्ये जमीन व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्‍नांची उत्तरे देण्यासाठी २७३ प्रश्‍नांचा संच तयार करण्यात आला आहे.
यावेळी बावनकुळे म्हणाले, ‘‘ही सेवा नागरिकांना महसूल खात्याची सेवा अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरेल. तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. २००२ पासून ७/१२ संगणकीकरण, मिळकत पत्रिका संगणकीकरण, भूमी नकाशांचे संगणकीकरण, तसेच भू-संदर्भीकरण यांसारखी पायाभूत कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात विभाग यशस्वी झाला आहे. आता ही अद्ययावत सेवा लोकांना नक्कीच फायदेशीर ठरेल.’’
सातबाराच्या संबंधित अनेक प्रश्‍नांवर शेतकऱ्यांना या चॅटबॉटच्या माध्यमातून उत्तरे मिळणार आहेत. भविष्यात या सेवेमध्ये एआयचा वापर करता येईल का, याबाबतही माहिती घेतली जात आहे. तसेच संकेतस्थळाशिवाय व्हॉट्सॲपवर ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे यांनी यावेळी सांगितले.

...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा मोठा निर्णय! बंद असलेले गेट्स आता पूर्वीसारखे उघडणार नाहीत; मंगळवारी वेळेत बदल

Police Action: धूलिवंदनला कायद्याचा कडक पहारा! उल्हासनगर पोलिस सतर्क; समाजकंटकांवर राहणार करडी नजर

Latest Marathi News Live Update : दुबईमध्ये अडकलेल्या नागरिकांना मंत्री गिरीश महाजनांचा फोन, परिस्थितीची घेतली माहिती

जगावर घोंगावतंय महायुद्धाचं संकट! Baba Vanga यांनी दशकांपूर्वीच केली होती भीषण युद्धाची भविष्यवाणी; सध्याच्या घटनांशी जुळतंय का भाकीत?

IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

SCROLL FOR NEXT