पुणे

जनरल तिकिटासाठी आता रांगेला फाटा ‘एम युटीएस’ सुविधा ः तिकीट निरीक्षक, बुकिंग क्लार्क देणार तिकीट

CD

पुणे, ता. २८ ः सण, उत्सवांच्या काळात आपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांना तास न् तास तिकीट खिडकीवर उभे राहावे लागते. आता, मात्र त्यांना रांगेत थांबण्याची आवश्यकता नाही. कारण रेल्वे प्रशासन आता प्रवाशांच्या सोयीसाठी ‘एम युटीएस’ ही सुविधा सुरु करीत आहे. पुणे स्थानकावर पहिल्यादांच ही सुविधा सुरु होत असून,
याद्वारे प्रवाशांना अवघ्या १० ते १२ सेकंदात जनरल तिकीट मिळणार आहे. तिकीट निरीक्षक, बुकिंग क्लार्क यांच्याकडे ‘एम- युटीएस’ नावाचे मशिन असणार असून, याद्वारे प्रवाशांना तिकीट दिले जाणार आहे.
पुण्यासह देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी असते. दिवाळी, छठ पूजा, नाताळ सारख्या महत्त्वाच्या सणांच्या वेळी ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. रेल्वे प्रशासन अतिरिक्त रेल्वे सोडते. मात्र प्रवाशांना तिकिटासाठी तास न् तास रांगेत थांबावे लागते. हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ‘एम - युटीएस’ ही सुविधा सुरु करीत आहे.
--------------
प्रवाशांना कसे मिळणार तिकीट :
- रेल्वे स्थानकावरील बुकिंग ऑफिस, फलाट अथवा स्थानक परिसरात प्रवाशांना तिकीट मिळेल.
- यासाठी प्रवाशांना कोणत्या प्रकारचे अँप वापरावे लागणार नाही अथवा रांगेत थांबावे लागणार नाही.
- ‘एम - युटीएस’ ही छोटे मशिन घेऊन तिकीट निरीक्षक अथवा बुकिंग क्लार्क उभे असतील.
- त्यांना आपण कोणत्या स्थानकाचे तिकीट हवे आहे, हे सांगितल्यानंतर अवघ्या १० ते १२ सेकंदांत जनरल तिकीट दिले जाईल.
- संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांकडे एक छोटे प्रिंटर असणार आहे. त्या प्रिंटरवरच छापील तिकीट दिले जाईल.
------------
प्रवाशांचा फायदा
- प्रवाशांना एटीव्हीएम किंवा तिकीट काउंटरच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही. त्यामुळे वेळेची मोठी बचत.
- ज्यांना मोबाईलमध्ये तिकीट दाखवणे सोयीचे वाटत नाही, त्यांच्यासाठी प्रिंटेड तिकीट मिळवण्याचा एक सोपा मार्ग उपलब्ध.
- ही सेवा फिरती असणार आहे. त्यामुळे कुठेही तिकीट उपलब्ध होणार
-----------------
पुणे रेल्वे स्थानक :
एकूण फलाट : ६
दैनंदिन प्रवासी संख्या : सुमारे १ लाख ७० हजार
पुण्याहून धावणाऱ्या प्रवासी गाड्या : १७०
लोकलच्या फेऱ्या : ४१
पुणे स्थानकावरून प्रवास सुरु करणाऱ्या रेल्वे : ७२
---------------
्‘‘प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच पुणे स्थानकावर ‘एम - युटीएस’ ही सेवा सुरु होत आहे. याद्वारे प्रवाशांना जनरल तिकीट घेण्यासाठी कोणत्याही रांगेत थांबण्याची गरज नाही. यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. विशेषतः गर्दीच्या वेळी प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: ''भारत-चीनने एकत्र येणं गरजेचं'', जपानमधून मोदींचा ट्रम्प यांना थेट मेसेज

Crime News : 'अश्लील रील्स बनवणं बंद कर' म्हटल्याने संतापली पत्नी... पतीवर चाकूने केला हल्ला...धक्कादायक घटना समोर

Maratha Protest: आंदोलकांसाठी आझाद मैदानात महापालिकेचा पुढाकार; पिण्याचे पाणी, शौचालयासह अनेक सुविधा उपलब्ध

Latest Maharashtra News Updates live: मुंबई पूर्व द्रुतगती मार्गावर ट्रॅफिक जाम, वाहनांच्या लांबच लांब रांगा

सोनू सूदने केला स्टार प्लसच्या नवीन शो 'संपूर्णा'चा ट्रेलर लॉन्च

SCROLL FOR NEXT