पुणे

विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

CD

पुणे, ता. ३० : विवाहाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर स्वारगेट पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा देविदास एकंडे (वय २५, रा. ध्रुता गाव, जि. धाराशिव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि एकंडे यांची ओळखी झाली होती. आरोपीने तरुणीला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व तरुणीला धमकावले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.

प्रवाशावर गुन्हा दाखल
पीएमपी वाहक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रवाशावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हडपसर भागात ही घटना घडली. याबाबत वाहक महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विजयकुमार उद्धवराव हारकळ (वय ३२, रा. खराडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पीएमपी वाहक आहे. आरोपी हारकळ याने प्रवासी तिकिटावरुन वाहक महिलेशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली, तसेच विनयभंग केला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच विनयभंग केल्याप्रकरणी हारकळवर गुन्हा दाखल केला आहे.


तरुणीला अश्लील संदेश
तरुणीला अश्लील संदेश पाठविणाऱ्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. योगेश राजेंद्र धनवडे (वय ३८, रा. गदेवाडी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणीचा समाज माध्यमातील मोबाईल क्रमांक (इन्स्टाग्राम) बदलून तिच्या समाज माध्यमातील खात्यात तांत्रिक फेरफार केली. आरोपीने तरुणीला अश्लील संदेश पाठविण्यास सुरुवात केली. आरोपीच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: तरुणपणी प्रेयसीवर चाकूने वार करुन गायब झाला; तब्बल ४८ वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात 'असा' अडकला

Nashik Jail Video : बघू ते नवलच! नाशिकच्या जेलमध्ये कैद्यांनी केली गांजा पार्टी; धक्कादायक व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

UP: सीएम योगींची गर्जना! मुलींच्या सुरक्षेशी खेळ केला, तर पुढच्या चौकात यमराज तयार उज्ज्वला योजनेतून महिलांना मोठं गिफ्ट

Ishan Kishan Century: १५ चौकार, ६ षटकार! कर्णधार इशान किशनचे थोडक्यात हुकले द्विशतक, टीकाकारांना दिले उत्तर...

बँकेच्या चुकीने UPSCची मुख्य परीक्षा हुकली, SBI तरुणाला देणार ७ लाखांची भरपाई; काय घडलं?

SCROLL FOR NEXT