पुणे

सोन्याच्या पावलांनी, गौराई आली!

CD

पुणे, ता. ३१ : ‘सोन्याच्या पावलांनी, गौराई आली’, असे म्हणत पारंपरिक पद्धतीने आणि प्रथेप्रमाणे रविवारी घरोघरी गौरींचे आगमन झाले. नव्या साड्या नेसलेल्या, अलंकार परिधान केलेल्या माहेरवाशिणी गौरींच्या आगमनाने चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते.
अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहनासाठी रविवारी सकाळपासून सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांपर्यंत मुहूर्त होता. त्यामुळे महिलांना आपल्या सोयीनुसार गौरींचे आवाहन आणि सजावट करण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला होता. महालक्ष्मी असे संबोधल्या जाणाऱ्या गौरींच्या आगमनासाठी महिलांमध्ये उत्साह होता. ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींसाठी विद्युत रोषणाई, फुलांच्या माळा आदींची सजावट करण्यात आली होती. तसेच, घरातील स्त्रियाही पारंपरिक पेहरावात सजल्या होत्या. बहुतांश घरांमध्ये दुपारनंतर तिन्हीसांजेपूर्वी गौरी आवाहन करण्यात आले.
‘सोन्याच्या पावलांनी, गौराई आली’, असे म्हणत माहेरवाशिणींचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. अनेक घरांमध्ये परंपरेप्रमाणे गौरींसाठी नव्या साड्यांची खरेदी करून त्या गौरींना नेसवण्यात आल्या होत्या. कुलाचारानुसार गौरीच्या पितळी तसेच शाडूच्या मुखवट्यांची पूजा करण्यात आली. काही घरांमध्ये खड्याच्या गौरींचे पूजन करण्यात आले. गौरी आगमनानंतर फराळाचे पदार्थ मांडून विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती.
गौरी आगमनानंतर महिलांची सोमवारी (ता. १) होणाऱ्या गौरी पूजनाच्या तयारीची लगबग सुरू झाली. हळदी-कुंकू समारंभातील खिरापत तयार करण्यापासून ते गौरी पूजनाच्या नैवेद्याच्या तयारीत महिला व्यग्र झाल्या होत्या. रविवारची सुट्टी असल्याने अनेक नागरिक गौरी आवाहनानंतर सायंकाळी सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी आणि देखावे पाहण्यासाठी बाहेर पडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी केला पत्रव्यवहार

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

Latest Marathi News Live Update: जैन मंदिरासंदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन

World Cup 2025: भारताचं टेन्शन वाढलं! सेमीफायनलसाठी ऑस्ट्रेलियाची कर्णधार करणार पुनरागमन, झळकावली सलग दोन शतकं

SCROLL FOR NEXT