पुणे

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज उड्डाणपुलाचे उद्‍घाटन सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटणार

CD

पुणे, ता. ३१ : काम पूर्ण होऊनही उद्‍घा‍टनाच्या प्रतिक्षेत असलेल्या सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या तिसऱ्या टप्प्याचे सोमवारी ( ता. १ ) दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.
नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ही माहिती दिली. यावेळी केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह आमदार उपस्थित राहणार आहेत. या पुलामुळे फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी हा प्रवास आता अधिक जलद आणि सुलभ होणार आहे.
सुमारे अडीच किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल पुण्यातील सर्वात लांबीचा उड्डाणपूल आहे. सिंहगड रस्ता, धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रूक, नांदेड सिटी, तसेच बेंगळुरू–मुंबई राष्ट्रीय महामार्गाशी जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे.

‘‘सिंहगड रस्ता परिसरात सकाळ-संध्याकाळ वाहतुकीचा ताण प्रचंड असतो. अशा परिस्थितीत ११८ कोटींचा सिंहगड रस्ता उड्डाणपूल प्रकल्प हा पुणे शहरातील एक महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या अत्याधुनिक प्रकल्प पूर्ण व्हावा म्हणून सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. तो आता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.’’
- माधुरी मिसाळ, नगरविकास राज्यमंत्री
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

पाणी मागणाऱ्या ६० वर्षीय वृद्ध महिलेला ‘मुले चोरणारी’ समजून मारहाण, नागपूरमधील धक्कादायक प्रकार...

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Latest Marathi Live Update: सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या विश्वस्त नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT