पुणे

‘गुरुस्मरणम’मध्ये झंकारतील अभिजात सुर

CD

पुणे, ता. २ : अभिजात भारतीय संगीताच्या स्वरक्षितीजावर अनेक कलाकारांनी आपल्या अपूर्व योगदानाने अढळस्थान निर्माण केले आहे. गुरूवरील परंपरेवरील श्रद्धा, भक्ती, आदर व कठोर साधनेतून मिळवलेल्या सिद्धीचा अनुभव त्यांनी मागे ठेवलेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रित स्वरशिल्पातून अनुभवयास मिळतो. अशा थोर कलाकारांचे कार्य पुढील पिढीस निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत असते, हे लक्षात घेऊन दिग्गजांनी केलेल्या साधनेचा, त्यांच्या सांगीतिक वाटचालीचा, त्यांच्या सांगीतिक विचारांचा व त्यांनी केलेल्या कार्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणे व त्यांच्या अनुयायांकडून त्यांची महती जाणून घेण्यासाठी ‘गुरुस्मरणम’ हा विशेष कार्यक्रम ४ ऑक्टोबरला होणार आहे. त्यात प्रख्यात सतारवादक उस्ताद शुजात हुसेन खान यांचे सादरीकरण होणार आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘गुरुस्मरणम’च्या या मालिकेमध्ये किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, जागतिक कीर्तीचे संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा, जयपूर घराण्याची उज्वल परंपरा गौरवाने पूर्ण नेणाऱ्या गानसरस्वती किशोरी आमोणकर, आपल्या चतुरस्र गायनाने एक आगळी-वेगळी गायनशैली निर्माण करणारे पं. वसंतराव देशपांडे, सतार वादनातील जागतिक कीर्तीचे महान कलाकार पं. रविशंकर व उस्ताद विलायत खान, रामपूर साहसवान घराण्याचे ज्येष्ठ गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान, देवगंधर्व गायनाचार्य पं. भास्करबुवा बखले, आपल्या चतुरस्र वादन शैलीने रसिकांच्या स्मरणात राहिलेले व्हायोलिन वादक पं. श्रीधर पार्सेकर, संगीत नाटकांना एक नवजीवन प्राप्त करून देणारे ज्येष्ठ गायक पं. जितेंद्र अभिषेकी, ज्येष्ठ सारंगीवादक उस्ताद सुलतान खान, तसेच मेवाती घराण्याचे ज्येष्ठ लोकप्रिय गायक पं. जसराज इत्यादी स्वरगंधर्वांचे स्मरण यानिमित्ताने करण्यात येणार आहे.


दिग्गज कलाकारांचा सहभाग
या स्मरण यात्रेमध्ये पं. हरिहरन, पं. विश्वमोहन भट्ट, पं. राहुल शर्मा, पं. आरती अंकलीकर, पं. आनंद भाटे, लोकप्रिय गायक राहुल देशपांडे, उस्ताद शुजात खान, पं. अतुलकुमार उपाध्ये, उस्ताद दिलशाद खान व पं संजीव अभ्यंकर, पं. शौनक अभिषेकी इत्यादी दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. याच मालिकेतील पहिल्या कार्यक्रमाचा प्रारंभ उस्ताद शुजात हुसेन खान यांच्या सादरीकरणाने होणार आहे.

गुरुस्मरणम कार्यक्रमाबद्दल...
कधी : ४ ऑक्टोबर
केव्हा : सायंकाळी ६.३० वा.
कुठे : बंटारा भवन, बाणेर
तिकिटे : BookMyShow वर उपलब्ध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results 2025 : बिहार निवडणुकीचा निकाल आज, नितीश कुमार की तेजस्वी; कोण होणार बाहुबली? देशाचे मतमोजणीकडे लक्ष

Panchang 14 November 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Morning Breakfast Recipe: बालदिनानिमित्त मुलांसाठी बनवा चविष्ट पोटॅटो चिला, नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी!

आजचे राशिभविष्य - 14 नोव्हेंबर 2025

अग्रलेख : विलंबाचे पारडे जड

SCROLL FOR NEXT