पुणे

चेन्नईहून पुण्यात येणार डबलडेकर बस

CD

पुणे, ता. ८ : ‘स्विच’ कंपनीने होकार दिल्यानंतर आता चेन्नईहून पुण्यात डबलडेकर बस दाखल होत आहे. ही बस पुण्यातील मगरपट्टा, हिंजवडी व खराडी परिसरात फिरवून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. ही चाचणी एक आठवडा चालणार असून, याचा सकारात्मक अहवाल आल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर बसचा ‘मार्ग’ मोकळा होणार आहे. पीएमपी प्रशासन डबलडेकर बसची सेवा ‘आयटी पार्क’ असलेल्या भागात सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
मुंबईतील ‘बेस्ट’च्या धर्तीवर पीएमपी प्रशासनानेही डबलडेकर बसची सेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काही दिवसापूर्वी मुंबईत ‘बेस्ट’ला सेवा देणाऱ्या ‘स्विच मोबिलिटी’ कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चादेखील केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर ही कंपनी पुण्यात डबलडेकर बसची सेवा सुरू करण्यास सकारात्मक आहे. या आठवड्यात चेन्नईहून या बस पुण्यात दाखल होणार आहे. बस पुण्यात आल्यानंतर आयटी पार्क भागात याची प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेतली जाणार आहे. यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांसह पीएमपीचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

कशी असेल नवी डबलडेकर बस :
- इलेक्ट्रिक व वातानुकूलित
- बसमध्ये उत्तम सस्पेन्शन, त्यामुळे प्रवास आरामदायक
- बसमध्ये डिजिटल तिकिटिंगची सोय
- लंडनमध्ये धावणाऱ्या बससारखा लुक

प्रवासी क्षमता अधिक
- प्रवासी क्षमता : बसलेले : ७० पर्यंत, उभे राहून : ४० प्रवासी .
- एकाच वेळी किमान १०० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे पीएमपीला जास्त बसची अथवा फेऱ्यांची गरज भासणार नाही.
- बसची किंमत : दोन कोटी रुपये.
- बसची उंची : १४ फूट ४ इंच असल्याने मेट्रोच्या स्थानकाचाही अडसर होणार नाही.
- पूर्वी पीएमपीच्या ताफ्यात ‘एसएलएफ’ प्रकारची डबलडेकर बस होती. त्याच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च जास्त होता.
नवी बस इलेक्ट्रिक आहे. त्याच्या देखभालीचा खर्च खूप कमी असणार आहे.

पीएमपीचा ‘प्रवास’
- एकूण बससंख्या : १६५०
- रोजचे प्रवासी : १२ लाख (सरासरी)
- प्रवासी उत्पन्न : १ कोटी ५० लाख (सुमारे)
- रोजचा प्रवास : ३ लाख ६० हजार किमी
- एकूण मार्ग : ३८१

या आठवड्यात चेन्नईहून पुण्यात डबलडेकर बस दाखल होत आहे. पुण्यातील विविध भागात या बसची चाचणी घेत, प्रवासी सेवेत काही अडचणी येतात का, हे पहिले जाईल. ही बस धावण्यास कोणतीही अडचण नसेल तर लवकरच पीएमपीच्या ताफ्यात डबलडेकर बस धावण्यास सुरुवात होईल.
- पंकज देवरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; India A कडून खेळण्याचा अद्याप निर्णय नाही

Latest Marathi News Updates: गणेश विसर्जनात कृत्रिम तलावांसाठी बीएमसीकडून लाखो लिटर पाण्याचा वापर

Shoumika Mahadik : मागची ४ वर्षे गोकुळच्या वार्षिक सभेला शौमिका महाडिकांची खुर्ची कोपऱ्यात, यंदा मात्र थेट मध्यभागी; सभा वादळी...

Shivaji Maharaj : कोल्हापुरात जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी...आजही शिवभक्त घेतात दर्शन!

Mumbai Local: लोकल कोंडीतून सुटका कधी? ‘एमयूटीपी’वर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च; गर्दी कायम

SCROLL FOR NEXT