पुणे

सायकल स्पर्धेसाठी रस्ते होणार चकाचक

CD

पुणे, ता. ८ ः टूर दी फ्रान्सच्या धर्तीवर ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धा पुणे शहर व जिल्ह्यात होणार आहे. यातील सुमारे ७५ किलोमीटरचा मार्ग पुणे शहरातून जात आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या मार्गावरील रस्ते डांबरीकरण, चेंबर दुरुस्ती, पादचारी मार्ग दुरुस्ती यासह अन्य सुधारणांसाठी १४५ कोटी ७५ लाख ८० हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
देशात आंतरराष्ट्रीय सायकलिंग व क्रीडा पर्यटनाला वाव देण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्यातर्फे जानेवारी २०२६ मध्ये ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. ‘टूर दी फ्रान्स’ या फ्रान्स येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या धर्तीवर होणारी ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा देशातील ‘सायकलिंग’ क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणार आहे. ही स्पर्धा देशातील व्यावसायिक सायकलपटूंसाठी २०२८ मध्ये लॉस एंजलिस येथे होणाऱ्या ऑलिंपिकसाठी पात्रता फेरी असणार आहे. त्यामुळे जगभरातील सायकलपटू पुण्यात येणार आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यात मिळून सुमारे ६८४ किलोमीटरची ही सायकल स्पर्धा होणार आहे. ‘यूसीआय’च्या ‘२.२ स्टेज रोड रेस’नुसार प्रमाणित असणारी देशातील ही पहिलीच सायकलिंग स्पर्धा असून या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय मान्यता असेल. या स्पर्धेच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन, पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिकेने कंबर कसली आहे.
या स्पर्धेसाठी रस्ते दुरुस्तीचे काम प्राधान्याने घेण्यात आले आहे. पुणे शहरात ७४.८० किलोमीटर एवढे अंतर सायकलपटू कापणार आहेत. शहरातील अनेक रस्त्यांवर चेंबर खचलेले आहेत, रस्ते एकसमान पातळीत नाहीत, पॅचवर्कमुळे पाठीला हादरे बसतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. त्यामुळे आता पुढील दोन ते तीन महिन्यांत शहराच्या ज्या भागांतून स्पर्धेचा मार्ग जाणार आहे, तेथील रस्ते चकाचक करण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली आहे. यासाठी प्रशासनाने रस्ते दुरुस्तीसाठी १४५ कोटी ७५ लाख ८० हजार २१२ रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले आहे. त्यास आज पूर्वगणनपत्रक समितीने (इस्टिमेट कमिट) मान्यता दिली आहे, अशी माहिती पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.

चार पॅकेजमध्ये काम
१) ९.४७ किलोमीटर लांबीच्या रस्ते दुरुस्तीसाठी ३० कोटी ८० लाख खर्च
२) २८.५३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी ३२.६७ कोटी खर्च
३) १४.३२ किलोमीटरसाठी ३८.२२ कोटी खर्च
४) पॅकेज चारमधील २२.४७ किलोमीटर रस्ते दुरुस्तीसाठी ४४.०५ कोटी खर्च
५) ‘जीएसटी’सह एकूण १४५ कोटी ७५ लाख खर्च

असा आहे सायकल मार्ग
- बालेवाडी-सूस- पाषाण-पुणे विद्यापीठ- राजभवन मार्ग- राजीव गांधी पूल-सेनापती बापट रस्ता- विधी महाविद्यालय रस्ता- प्रभात रस्ता-डेक्कन जिमखाना-गोपाळकृष्ण गोखले रस्ता- शिवाजीनगर- जंगली महाराज रस्ता (लांबी २८ किलोमीटर)
- कर्वे रस्ता- नळस्टॉप-कर्वे पुतळा- भेलकेनगर चौक- सुतार दवाखाना- वनाज कॉर्नर- एसएनडीटी- म्हात्रे पूल (लांबी ८.५ किलोमीटर)
- शास्त्री रस्ता-टिळक रस्ता-बाजीराव रस्ता-शनिवारवाडा-मंडई- शिवाजी रस्ता-खडकमाळ अळी- हिराबाग- सारसबाग- मित्रमंडळ चौक-महर्षीनगर- नेहरू रस्ता- जुनी जिल्हा परिषद- लाल महाल- शनिवारवाडा- शिवाजी पूल (लांबी २.३० किलोमीटर)
- कँटोन्मेंट हद्द- नवी व जुनी जिल्हा परिषद- रेड चर्च- महात्मा गांधी रस्ता- गुरुद्वारा रस्ता- रेसकोर्स-राष्ट्रीय युद्ध संग्रहालय-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक- नवीन जिल्हा परिषद (लांबी ८.२ किलोमीटर)
- ईस्ट स्ट्रीट- पुलगेट- गोळीबार मैदान- लुल्लानगर- कोंढवा-खडी मशिन चौक- येवलेवाडी- बोपदेव घाट (लांबी १२.८० किलोमीटर)
- खडकवासला चौपाटी - कोळेवाडी- किरकटवाडी- नांदेड सिटी (लांबी ५ किलोमीटर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT