पुणे

गर्भावस्‍थेतील मद्यपान बाळासाठी धोकादायक

CD

पुणे, ता. ८ : गर्भावस्थेतही मद्यपान करताय? तर हे थेट गर्भवतीच्‍या आरोग्‍यावरच नव्‍हे तर होणाऱ्या बाळावरही परिणाम करू शकते. अल्‍कोहोल थेट गर्भातील बाळाच्या रक्तप्रवाहात पोहचते. या टप्प्यावर शरीराचे आणि मेंदूचे अवयव अजून विकसित होणार असल्‍याने म‌द्याचा अंश मेंदूच्या पेशींना कायमचे नुकसान करतो आणि परिणामी बाळाला ‘फीटल अल्‍कोहोल सिंड्रोम’(एफएएस) निर्माण होऊ शकतो. अशा मुलांना शिकण्यात अडचणी, स्मरणशक्ती कमी, भाषिक विकासात उशीर, चेहऱ्यावर व शरीरावर विकृती, भावनिक अस्थिरता आणि वर्तनात्मक अडचणी दिसून येतात, अशी माहिती तज्‍ज्ञ देतात.
दरवर्षी ९ सप्टेंबर हा ‘जागतिक फीटल अल्‍कोहोल सिंड्रोम’ दिन साजरा केला जातो. नऊ महिने हा काळ गर्भवती महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा असतो. या काळात एक थेंबही मद्यपान न करणे हे बाळाच्या निरोगी जन्मासाठी आवश्यक असते. याबाबत माहिती देताना वरिष्‍ठ स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ डॉ. मिलिंद तेलंग म्‍हणाले, ‘‘गर्भावस्‍थेत मद्यपानाचा सल्‍ला कधीही दिला जात नाही. गर्भावस्‍थेत मद्यपान टाळले जाते.’’
आजच्या घडीला मद्यपान करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढते आहे. शहरी जीवनशैलीतील ताणतणाव, समवयस्क दबाव, पार्टी कल्चर आणि मद्य कंपन्यांची आक्रमक जाहिरात यामुळे म‌द्यपान सामान्य झाले आहे. परिणामस्वरूप यकृताचा आजार, कर्करोग, मानसिक विकार, आत्महत्यांचे प्रमाण, तसेच रस्ते अपघात आणि हिंसाचार वाढले आहेत. या सर्वांचा परिणाम थेट कुटुंबांवर व समाजावर होतो. मद्यपींची संख्या जितकी वाढेल तितक्या ‘एफएएस’ व इतर न्यूरो-डेव्हलपमेंट विकारांनी त्रस्त बालकांची संख्याही वाढेल, असा धोका संतुलन व्‍यसनमुक्‍ती केंद्राचे मानस मेहेंदळे यांनी व्‍यक्‍त केला. उ‌द्याची निरोगी, सक्षम आणि सुदृढ पिढी घडवायची असेल तर आजपासून जागरूक होणे अत्यावश्यक आहे. नऊ महिने संयम म्हणजे आयुष्यभरासाठी निरोगी मूल हीच या दिवसाची खरी शिकवण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.


‘एफएएस’चे तोटे
- ‘एफएएस’ ग्रस्त मुलांमध्ये स्वमग्नता, अभ्यास किंवा कामावर लक्ष केंद्रित न करता येणारा ‘अटेंशन डेफिसिट हायपरॲक्‍िटव्‍हीटी डिसॉर्डर होण्‍याची शक्‍यता वाढते
- बौ‌द्धिक कमजोरी, अतिचंचलता, लक्ष केंद्रित न होणे, झोपेचे विकार, नैराश्य आणि सामाजिक कौशल्यांचा अभाव असे विकार देखील दिसतात.
- मानसिक आजार, स्वतःला हानी पोहोचवण्याची प्रवृत्ती आणि लहान वयात व्यसनाकडे झुकण्याची शक्यता वाढते.
- या मुलांना केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे तर विशेष शिक्षण, समुपदेशन आणि आजीवन आधाराची गरज असते.
- हे धोके टाळण्‍यासाठी मद्यपान टाळायला हवे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT