पुणे

‘रोटरी आर्ट एक्झिबिशन’चे रविवार, सोमवारी आयोजन

CD

पुणे, ता. ९ : रोटरी क्लब ऑफ कात्रज आणि रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३१तर्फे ‘रोटरी आर्ट एक्झिबिशन’चे रविवारी (ता. १४) व सोमवारी (ता. १५) आयोजन केले आहे. हे प्रदर्शन जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व कलादालन येथे सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत होणार आहे. या चित्रांच्या विक्रीतून जमा होणारा निधी रोटरी क्लबच्या सामाजिक प्रकल्पांसाठी वापरला जाणार असल्याची माहिती क्लबचे अध्यक्ष डॉ. अजय काळे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले आहे.
या प्रदर्शनात जलरंगचित्रकार मिलिंद मुळीक यांची कलाकृती, दिलीप पंडित यांची वन्यजीव छायाचित्रे, तसेच अंजली हुगे यांची ऐतिहासिक तैलचित्रे ठेवण्यात आली आहेत. मुळीक यांनी जगभरात एकल प्रदर्शने भरवली असून, त्यांच्या ‘जलरंग’ पुस्तकाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. पंडित यांची आफ्रिका व भारतातील जंगलांमधील छायाचित्रे प्रदर्शनात आकर्षण ठरणार आहेत. तर हुगे यांनी राजमाता जिजाबाई, कृष्णदेवराय यांच्यासह ऐतिहासिक मालिकांवर चित्रण केले असून सध्या त्या आदि शंकराचार्य मालिकेवर कार्यरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: ''प्रतिष्ठेसाठी सियाने केतनला ठार मारण्याचा प्लॅन केला'', पोलिस चौकशीत चेतनचा धक्कादायक दावा

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उद्या निकाल

SCROLL FOR NEXT