पुणे

सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

CD

पुणे, ता. ९ : पद्मावती-तळजाई परिसरात दहशत माजविणाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगार साहिल गणेश वायदंडे (वय २५) याला पोलिसांनी अटक केली. त्याला ‘एमपीडीए’अंतर्गत एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
साहिल वायदंडे याच्याविरुद्ध पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. सहकारनगर पोलिसांनी त्याच्यावर ‘एमपीडीए’अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार केला. त्यावर १२ ऑगस्टला पोलिस आयुक्तांनी स्थानबद्धतेचा आदेश दिला. मात्र, त्यानंतर तो फरार झाला होता. स्वारगेट येथे तो मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल पवार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, साहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण, साहाय्यक निरीक्षक सद्दाम हुसेन फकीर, फिरोज शेख, साहाय्यक उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, गोरख ढगे, हरिश्चंद्र चोरमले, मारोती नलवाड, किरण कांबळे, विनायक एडके, सागर सुतकर, अमित पदमाळे आणि महेश भगत यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

Latest Marathi News Live Update : अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल

Mumbai News: बेस्टला पालिकेची मदत, ताफ्यात २७५ नव्या ई बस, १७० कोटी पुनर्विकासाचे मिळणार

Mumbai News: कारवाई रोखण्यासाठी कट, न्यायाधीशांचीच मारली सही; न्यायालयाचा धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT