पुणे

डंपरची धडक बसून फुरसुंगीतील दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

पुणे, ता. ९ : भरधाव डंपरची धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना हडपसर परिसरातील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ मॅरिगोल्ड सोसायटीसमोर सोमवारी घडली.
अभिजित गणेश रेवले (वय १९, रा. संकेत विहार, फुरसुंगी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत रतन काळे (रा. फुरसुंगी) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालक सूर्यकांत दिगंबर श्रीरामे (वय ३६, रा. होले वस्ती, उंड्री) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजित रेवले सोमवारी (ता. ८) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी दुचाकीवर निघाला होता. त्यावेळी भरधाव डंपरचालकाने मॅरिगोल्ड सोसायटीसमोर त्याच्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अभिजित रेवले हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करीत आहेत.
शहरात भरधाव डंपरचालकांमुळे वारंवार अपघात होत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डंपरचालकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT