पुणे

साताऱ्यातील संमेलनाध्यक्ष रविवारी ठरणार

CD

पुणे, ता. १० ः सातारा येथील नियोजित ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड रविवारी (ता. १४) होणार आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाची महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक होणार असून यावेळी संमेलनाध्यक्ष पदासह संमेलनाच्या तारखांचीही घोषणा होणार आहे.
शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याची साहित्य वर्तुळात उत्सुकता आहे. अध्यक्षपदासाठी शर्यतीत असलेली नावे सध्या तरी गुलदस्तात आहेत. मात्र, काही महिन्यांपूर्वी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांची ग्रंथभेट देण्याच्या निमित्ताने त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती.
साहित्य संमेलनाला ‘रिकामटेकड्यांचा उद्योग’ म्हणणाऱ्या नेमाडे यांचे अध्यक्षपदासाठी मन वळविण्याचा प्रयत्न प्रा. जोशी यांनी या भेटीत केल्याचे समजते. ही ‘कृष्णशिष्टाई’ यशस्वी ठरली तर नेमाडे संमेलनाध्यक्ष झाल्याचे पाहायला मिळू शकते. मात्र, १००व्या साहित्य संमेलनाचे जवळ आलेले औचित्य पाहता हा योग पुढच्या वर्षी जुळून येण्याचीही चिन्हे आहेत. नेमाडे यांच्याप्रमाणेच संमेलनावर टीका करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनाही अध्यक्षपदासाठी विचारणा करण्यात आल्याचे समजते.

महत्त्वाचे
- महामंडळाच्या बैठकीत चार घटक संस्थांची प्रत्येकी तीन असे १२ आणि बृहन्महाराष्ट्रातील समाविष्ट व संलग्न संस्थांचे ६ प्रतिनिधी, तसेच विद्यमान अध्यक्ष असे १९ सदस्य उपस्थित असतील
- घटक, संलग्न आणि समाविष्ट संस्थांनी सुचविलेल्या नावांवर चर्चा करून संमेलनाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाणार
- तत्पूर्वी शनिवारी (ता. १३) महामंडळाच्या मार्गदर्शक समितीची बैठक होणार
- या बैठकीत संमेलनाच्या रूपरेषेवर चर्चा केली जाईल

महामंडळाच्या भूमिकेकडे लक्ष
महामंडळाचे कार्यालय पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे (मसाप) आल्यानंतरचे हे पहिलेच संमेलन आहे. विशेष म्हणजे हे संमेलन ‘मसाप’च्याच कार्यक्षेत्रात होणार असून ‘मसाप’चीच शाहूपुरी शाखा ही संमेलनाचे संयोजन करत आहे. गेल्या काही वर्षांपासून संमेलनातील साहित्यबाह्य कार्यक्रम, अव्यवस्था अशा गोष्टींबाबतच अधिक चर्चा होत असल्याने महामंडळाच्या नूतन कार्यकारिणीने याबाबत उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर बैठकीत काय निर्णय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon :खडसेंच्या घरात चोरी! ५ तोळं सोनं आणि ३५ हजार लंपास; एकनाथ खडसे म्हणाले, जळगावात पोलिसांचा धाक राहिला नाही

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरामध्ये कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; फसवणुकीचा मोठा गोरखधंदा उघडकीस

Ranji Trophy 2025: पावसाच्या व्यत्ययात मुंबई संघाची कसरत; छत्तीसगडविरुद्ध पहिल्या डावात आघाडीसाठी आता चार विकेटची गरज

UP Encounter: योगींच्या पोलिसांनी एका शहरात केले डबल एनकाऊंटर! तिघांच्या पायाला गोळी; गुन्हेगारीचा मोठा इतिहास!

Arjun Tendulkar: 4,4,4,4,4,4,6! अर्जुनच्या फटकेबाजीमुळे गोवा संघाचा कमबॅक; आधी ३ विकेट्स घेऊन कर्नाटकला दिलेले धक्के...

SCROLL FOR NEXT