पुणे

जूनअखेर होणार उड्डाणपूल खुला

CD

फोटो येणार आहे
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २६ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील (आचार्य आनंदऋषीजी चौक) दुमजली उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पाषाणकडील रॅम्प वगळता जूनअखेर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. त्या दृष्टीने प्राधिकरणाने नियोजन केले आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी नागरिकांना आता केवळ दोन महिन्यांची वाट पहावी लागणार आहे.

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्प आणि गणेशखिंड व सेनापती बापट रस्त्यावरून पाषाण, बाणेर आणि औंधकडे सुरळीत वाहतुकीसाठी विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. गणेशखिंड रस्त्यावरील ई स्केअर आणि बाणेर येथे ज्या ठिकाणी पूल उतरणार आहे. त्या ठिकाणच्या खांबांचे (पिलर्स) काम पूर्ण झाले आहे. मुख्य चौकात उड्डाणपुलाचे खांब उभारण्याचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. त्यावर ५५ मीटर लांबीचे आणि सुमारे १८ ते २० मीटर रुंदीचे लोखंडी गर्डर टाकण्याचे काम वेगाने सुरू आहे. हा दुमजली उड्डाणपूल असल्याने ३२ खांब असून ते उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले.

डॉ. म्हसे म्हणाले, ‘‘औंध आणि शिवाजीनगर कडील रॅम्पचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. २० मे पर्यंत ते वाहतुकीसाठी खुले होऊ शकतात. तर बाणेरकडील रॅम्पचे काम देखील होत आले आहे. पाषाणकडील रॅम्पचे काम वगळता तीस जूनपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल.’’

...म्हणून काम लांबणीवर
यापूर्वी मे महिन्यात पुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात आले होते. परंतु जागा ताब्यात मिळण्यास आणि रस्तारुंदीकरणाच्या कामास विलंब झाल्याने उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होण्यास जून महिना लागणार आहे.

घटनाक्रम
- १४ जुलै २०२० ला अस्तित्वातील उड्डाणपूल पाडला.
- मेट्रो प्रकल्प आणि उड्डाणपुलाच्या कामासाठी टाटा कंपनीबरोबर २५ नोव्हेंबर २०२१ ला करार
- मेट्रो प्रकल्प ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे बंधन
- परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने ऑक्टोबर २०२३ मध्ये दुमजली पुलाचे काम सुरू
- आतापर्यंत उड्डाणपुलाचे काम जवळपास पूर्ण
- उड्डाणपुलाचा अंदाजित खर्च २५० कोटी रुपये
- उड्डाणपुलाचा काही भाग जूनअखेर खुला होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT