पुणे

पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्याच्या लघुपटाची ‘कान’ला निवड

CD

पुणे, ता. २६ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज’ विभागाचा माजी विद्यार्थी साहिल इंगळे याची निर्मिती असलेल्या ‘अ डॉल मेड अप ऑफ क्ले’ या लघुपटाची निवड प्रतिष्ठेच्या कान चित्रपट महोत्सवात झाली आहे. महोत्सवातील ‘ला सिनेफ’ या विभागात हा लघुपट निवडला गेला आहे.
मूळचा विदर्भातील अकोला शहराचा, पुणे विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आणि सध्या कोलकाताच्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’मध्ये शिकत असलेल्या साहिलचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाच्या कान महोत्सवात लघुपटाच्या रूपाने तो भारताचे प्रतिनिधित्त्व करणार आहे.
या लघुपटाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘झिरो बजेट’ अर्थात फारसा कोणताही खर्च न करता या लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. साहिल सध्या ‘सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट’मध्ये चित्रपट व दूरचित्रवाणी निर्मिती या विभागात शिकतो. या शिक्षणाचा भाग म्हणून त्याने या लघुपटाची निर्मिती केली आहे. अशा प्रकारची निर्मिती करत असताना कोणतेही आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळे निर्माता म्हणून कमीत कमी खर्चात दर्जेदार निर्मिती करण्याचे आव्हान असते. ते साहिलने उत्तमरीत्या पेलले.
निर्माता म्हणून संहितेची निवड, संहितेत आवश्यक असणारे बदल, दिग्दर्शक आणि कलाकारांची निवड, चित्रीकरणासाठी स्थळ निवड, अशी सगळी जबाबदारी साहिलने सांभाळली. यातून या लघुपटाचा दिग्दर्शक इथिओपियाचा, संकलक बांगलादेशाचा आणि नट नायजेरियातील, असा अनोखा आंतरराष्ट्रीय संगम जुळून आला आहे. यातील दिग्दर्शक आणि संकलक हे साहिलचे विद्यापीठातील मित्र आहेत. तर प्रमुख भूमिकेत असलेला नट हा नायजेरियातून भारतात फुटबॉल खेळण्यासाठी आला आहे. त्याच्याच आयुष्यातील काही अनुभवांवर हा लघुपट आधारलेला आहे.

निर्माता म्हणजे केवळ पैसे देणारा नाही
‘‘निर्माता म्हटल्यावर केवळ पैसे देणारा, असा सर्वसाधारण समज असतो. मात्र निर्मात्याचे कामही सर्जनशील प्रकारचेच असते. मीदेखील निर्मिती विभागाचे शिक्षण घेणार, हे सांगितल्यावर आई-वडिलांनी शंका उपस्थित केली होती. मात्र आता नेमके काम समजल्यावर त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे’’, असे साहिल सांगतो.

कान चित्रपट महोत्सवात आपल्या लघुपटाची निवड होणे, ही खरोखर स्वप्नवत गोष्ट आहे. महोत्सवात देशाचे प्रतिनिधित्व करता येणे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्या मातीची, आपल्या देशाची ओळख तेथे गौरवास्पद पद्धतीने करून देण्याचा माझा प्रयत्न असेल.
- साहिल इंगळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक तज्ज्ञ प्राध्यापिका रडारवर; मनीषा हवालदारचे सीबीआय चौकशीत धक्कादायक खुलासे !

Beed Crime News : बीड पुन्हा हादरले! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती; उमेश दळवीची निघृण हत्या, बेदम मारहाणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Latest Marathi News Live Update : राज्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा इशारा

दिवाळीनंतर नाही तर दिवाळीपूर्वीच होणार रणबीर कपूरचा रामायण सिनेमा रिलीज !

Pune News: पुण्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; उकाड्यातून दिलासा; पुणेकरांना आज पावसाची साथ; हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT