पुणे, ता. २६ : ‘‘यशाचे शिखर गाठण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करण्याची व अहोरात्र कष्ट करण्याची आवश्यकता असते,’’ असे मत मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कारविजेते ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना क्रीडाक्षेत्रातील करिअरच्या संधी, खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, क्रीडा शिष्यवृत्त्या, खेळाडूंचा आहार, क्रीडा माध्यमातून नेतृत्व आणि वेळेच्या व्यवस्थापनाबाबत माहिती होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ टिळक रस्ता संस्थेतर्फे कर्वेनगर येथे मिलेनियम स्कूलमध्ये दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित केली होती. उद्घाटन कुंटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग गाडगीळ, सचिव देवदत्त हंबर्डीकर, स्वाती पाटील, मिलेनियम संस्थेचे संचालक अन्वित फाटक उपस्थित होते.
कुंटे म्हणाले, ‘‘नेहमीच आपल्यापेक्षा अनुभवाने वरचढ असलेल्या खेळाडूवर मात करण्याचे ध्येय ठेवले की आपोआप आपली कामगिरी त्याच्या इतकी होऊ शकते. मात्र आजकाल टेलिव्हिजन व मोबाईलमुळे मुलांचे मैदानाचे आकर्षण कमी झाले आहे. मुलांनी खेळामध्ये करिअर करण्यासाठी पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.’’
क्रीडा क्षेत्रातील शिष्यवृत्ती व करिअरच्या संधींविषयी इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे संस्थापक संचालक डॉ. विपुल लुणावत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.