पुणे

म्हाडाची इमारत मोडकळीस; पुनर्विकासासंदर्भात महापालिकेकडून टाळाटाळ रहिवाशांचा जीव धोक्यात

CD

म्हाडाची इमारत मोडकळीस; पुनर्विकासासंदर्भात महापालिकेकडून टाळाटाळ

पुणे, ता. ४ : येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड सोसायटीमधील ‘आदित्य नारायण सहकारी गृहरचना सोसायटीतील एम-२४’ ही इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून इमारत मोडकळीस आली असून, इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भात महापालिकेकडून वारंवार टाळाटाळ केली जात आहे. अनेकदा प्रयत्न करूनही प्लॅन मंजुरीची प्रक्रिया प्रलंबित असल्याने रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एम-२४ ही इमारत ४० वर्षांपूर्वी बांधली आहे. गेल्या १५ वर्षांपासून ती मोडकळीस आली आहे. यामुळे येथील अनेक कुटुंबे इमारत सोडून इतर ठिकाणी राहण्यासाठी गेली आहेत, तर ३६ कुटुंबांतील २५० नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत. सोसायटीने पुनर्विकासासाठी म्हाडा पुणे, एअर फोर्स, उपनिबंधक कार्यालय, अग्निशामक दल यांच्याकडून ‘ना हरकत प्रमाणपत्रे’ मिळवली आहेत. याशिवाय स्ट्रक्चरल ऑडिट, माती परीक्षण आणि पर्यावरण अहवाल या सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करूनही महापालिकेतर्फे एक वर्षापासून बांधकाम मंजुरीसाठी विलंब होत आहे.
सोसायटीचे सचिव राजेश बागमार आणि अध्यक्ष प्रशांत खंडाळे यांनी सांगितले की, ‘‘महापालिकेच्या बांधकाम विभागाला यासंदर्भात वारंवार निवेदने दिली आहेत. मात्र बांधकामास मंजुरी देण्याऐवजी, रहिवाशांना घरे सोडून जाण्यासाठी नोटीस पाठविल्या आहेत, जे अत्यंत दुर्दैवी आहे. या इमारतीत ७० ते ८० वर्षांचे वृद्ध नागरिक राहत असून, त्यांच्या राहण्याची कोणतीही पर्यायी व्यवस्था प्रशासनाकडून केली जात नाही.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली यांची हवा! भारतीय क्रिकेटमध्ये सात वर्षांत जे कधी नाही घडले, ते होणार; चाहत्यांसाठी मेजवानी...

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : नागपूर मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची बदली

SCROLL FOR NEXT