पुणे, ता. ५ ः राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. यावर्षी जानेवारीपासून आतापर्यंत २७४५ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले असून, त्यापैकी ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे व २६७० रुग्ण बरे झाले आहेत. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के इतके आहे, तर सध्या केवळ ३२ रुग्ण उपचाराधीन आहेत.
राज्यातील इन्फ्लूएंझासदृश आजार आणि तीव्र श्वसन संसर्ग यांसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणांतर्गत संशयित रुग्णांची कोरोना चाचणी केली जाते. सद्यःस्थितीत कोरोनाचे बहुतेक रुग्ण सौम्य स्वरूपाचे आहेत. राज्यात जानेवारीपासून एकूण ४३ हजार ५२६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यात मुंबईत सर्वाधिक ११०४ रुग्ण नोंदले गेले असून, मे महिन्यात ४३५ आणि जून महिन्यात ५५१ असे सर्वाधिक रुग्ण सापडले होते, तर ५ ऑगस्ट रोजी राज्यात ५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, त्यात ४ मुंबईतील आणि १ छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील आहे.
आतापर्यंत कोरोनाशी संबंधित ४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, किडनी विकार, फुफ्फुसांचे आजार अशा गंभीर सहव्याधी आढळल्या आहेत. राज्यात कोरोना परिस्थितीवर नियमित देखरेख ठेवली जात आहे. ५ टक्के रुग्ण इन्फ्लूएंझासदृश व सर्व तीव्र श्वसन संसर्ग रुग्णांची कोरोना चाचणी घेणे, पॉझिटिव्ह नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण करणे आणि सर्व सरकारी रुग्णालयांत तपासणी व उपचार सुविधा सुरू ठेवण्याचे निर्देश आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना दिले आहेत.
नागरिकांनी सतर्कता पाळत आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. सरकारच्या प्रयत्नांतून आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवत असल्याचे चित्र दिसत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.