पुणे

खेवलकरसह अन्य आरोपींची चौकशी करा रेव पार्टीप्रकरणी राज्य महिला आयोगाचे पुणे पोलिसांना आदेश

CD

पुणे, ता. ६ ः खराडी येथील हॉटेल स्टेबर्डमध्ये झालेल्या अमली पदार्थ पार्टीतील आरोपी डॉ. प्रांजल खेवलकरसह अन्य आरोपींची सखोल चौकशी करावी, असे आदेश राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना दिले आहेत.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने गेल्या महिन्यात खराडीतील हॉटेलवर छापा टाकला होता. या कारवाईत पोलिसांनी गांजा आणि कोकेन असे अमली पदार्थ जप्त केले होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर (वय ४१, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, हडपसर), निखिल जेठानंद पोपटाणी (वय ३५, रा. डीएसके सुंदरबन, माळवाडी), समीर फकीर महंमद सय्यद (वय ४१, ऑर्किड सोसायटी, एनआयबीएम रस्ता, कोंढवा), सचिन सोनाजी भोंबे (वय ४२, डायमंड पार्क सोसायटी, वाघोली) आणि श्रीपाद मोहन यादव (वय २७, रा. पंचतारानगर, आकुर्डी) यांच्यासह दोन तरुणींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणातील सात आरोपी हे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. डॉ. खेवलकर वेगवेगळ्या मित्र व मैत्रिणींसह गेल्या दीड वर्षात ४३ दिवस या हॉटेलमध्ये राहिला आहे, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.
या प्रकरणात राज्य महिला आयोगाला सानवी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेकडून तक्रार देण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये परप्रांतीय तरुणींना आमिष दाखवून बोलावल्याचे दिसून येत आहे. संघटित गुन्हेगारी, तसेच मानवी तस्करी प्रकरण असल्याचा आरोप संबंधित संस्थेने राज्य महिला आयोगाला दिलेल्या पत्राद्वारे केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. आयोगाने या अर्जाच्या अनुषंगाने पुणे पोलिसांना या प्रकरणाची अनैतिक मानवी तस्करी प्रतिबंधक विभाग आणि सायबर विभागाकडून या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

‘‘खराडीतील पार्टी प्रकरणात महिला आयोगाचे पत्र पोलिसांना मिळाले आहे. त्याअनुषंगाने चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : अक्षर पटेलने 'त्या' दोघांना दिल्ली कॅपिटल्सचा विजय समर्पित केला; मन जिंकणारी कृती, फॅन्सही हळहळले... नेमकं काय घडलं?

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २ मे २०२६ ते ८ मे २०२६ - मराठी राशी भविष्य

सकाळच्या चहा-नाश्त्याला परफेक्ट क्रंच! कुरकुरीत मसूर डाळ वड्यांची झणझणीत रेसिपी लगेच लिहून घ्या!

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

SCROLL FOR NEXT