पुणे

पुणे पालिकेकडून सल्लागार, ठेकेदार कंपनीला नोटिसा

CD

पुणे, ता. ६ : जायका प्रकल्पातंर्गत नांदेड सिटी येथे सांडपाणी वाहिनी टाकण्याच्या कामाच्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटना प्रकरणात सल्लागार कंपनी आणि ठेकेदार कंपनीकडून नियमांचे उल्लंघन झाले असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या दोघांनाही महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.

शहरात निर्माण होणाऱ्या शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मुळा-मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पांतर्गत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा चार कामगारांच्या अंगावर पडल्याची घटना सोमवारी (ता. ४) सायंकाळी नांदेड सिटीच्या शेजारी घडली. या ढिगाखाली चार कामगार अडकले होते. त्यापैकी एका कामगाराचा मृत्यू झाला, तर तीन कर्मचारी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
जायका प्रकल्पासाठी महापालिकेकडून एमजेएफ आणि पेल फ्रिशमन यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर एन्व्हायरो कॅन्ट्रोलस्‌ नावाच्या ठेकेदार कंपनीला सांडपाणी प्रकल्प उभारणीचे काम देण्यात आले आहे.

या निविदेतील अटी-शर्तीनुसार ठेकेदार कंपनीने कामाचे सबलेट (उक्त काम देणे) करताना सल्लागार कंपनीची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे, परंतु या प्रकरणात सल्लागार कंपनीकडून ठेकेदार कंपनीने परवानगीच घेतली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे अटी-शर्तींचा भंग झाला आहे. २०१८-१९ मध्ये बंगलोर येथे हुब्बळ येथे सांडपाणी प्रकल्प दुर्घटना घडली होती. तेथेही तीन मजुरांचा मृत्यू झाला होता. महापालिकेने नेमलेल्या सल्लागार कंपनीपैकी एक कंपनी त्यामधील असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिकेने सल्लागार कंपनी आणि ठेकेदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे, तसेच या दुर्घटनेसंदर्भातील अहवाल जायकाला पाठविण्यात आला आहे.
--------
नांदेड सिटी येथील दुर्घटना प्रकरणात ठेकेदार कंपनीने निविदेतील अटी-शर्तीनुसार कामाचे सबलेट करताना (उक्त काम देताना) सल्लागार कंपनीची परवानगी घेणे बंधनकारक होते, परंतु ती परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सल्लागार कंपनी आणि ठेकेदार कंपनी या दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली आहे, तसेच जायकालादेखील या दुर्घटनेचा अहवाल पाठविण्यात आला आहे.
-जगदीश खानोरे, मुख्य अभियंता, जायका प्रकल्प

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT