पुणे

करार मोडलेल्या खेळाडूस द्यावी लागणार भरपार्इ

CD

पुणे, ता. २५ : फुटबॉलपटू उपलब्ध करणाऱ्या व्यवस्थापन कंपनीबरोबरील कराराचा भंग केल्याबद्दल खेळाडूने भरपाई द्यावी, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.
या प्रकरणात कंपनीने खेळाडूवर कराराचा भंग केल्याचा, नुकसानभरपाई देण्याचा व कमिशनच्या वसुलीचा खटला दाखल केला होता. दिवाणी न्यायाधीशांनी (वरिष्ठ स्तर) खटला दाखल झाल्यापासून भरपाईची रक्कम पूर्ण वसूल होईपर्यंत वार्षिक १२ टक्के व्याजासह एक लाख २२ हजार ५०० रुपये कंपनीला देण्याचे निर्देश खेळाडूला दिले.
फुटबॉलपटू उपलब्ध करणारी केएसएमएन व्यवस्थापन कंपनी आणि एका फुटबॉलपटूशी एक जानेवारी २०१९ ला चार वर्षांचा प्रतिनिधित्व करार केला. फुटबॉल खेळण्यासाठी संधी शोधणे, प्रशिक्षण आणि इतर व्यवस्थापन सेवा पुरविण्यासंदर्भात करार होता. संबंधित खेळाडूने आठ जुलै २०२० रोजी एकतर्फी ई-मेलद्वारे करार समाप्त केल्याचे कंपनीला कळविले. त्याने करारानुसार देणे असलेले दोन लाख ५० हजार रुपये बाकी ठेवले, असे दाव्यात नमूद आहे.
कंपनीने ॲड. निखिल कुलकर्णी यांच्यामार्फत दावा दाखल केला. फिर्यादीकडून सेवेत त्रुटी राहिल्याने दावा ग्राह्य धरला जाऊ नये, असा युक्तिवाद खेळाडूने केला. संपूर्ण प्रकरण न्यायालयाने ऐकले आणि कंपनीच्या बाजूने निकाल दिला.
---
प्रतिनिधित्व करार म्हणजे काय?
- फुटबॉल किंवा इतर क्रीडाप्रकारांत खेळाडू आणि व्यवस्थापन संस्था यांच्यात असा करार होतो
- एक व्यक्ती आणि एजंट किंवा व्यवस्थापक यांच्यातील अधिकृत कराराचे स्वरूप
- एजंट, व्यवस्थापक किंवा व्यवस्थापन कंपनी खेळाडूच्या वतीने काम करते
- खेळाडूला कारकीर्द घडविण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देणे, कराराच्या वाटाघाटी करणे, प्रशिक्षण आणि विकास घडविणे, कायदेशीर आणि वित्तीय बाबींत मदत अशा अटींचा समावेश
---
या निकालामुळे खेळाडू व्यवस्थापन क्षेत्रातील करारांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. व्यावसायिक खेळाडूंनी कराराच्या अटींचे पालन करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे भविष्यात खेळाडू आणि व्यवस्थापन कंपन्यांमध्ये स्पष्टता आणि त्यांची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
- ॲड. निखिल कुलकर्णी, व्यवस्थापन कंपनीचे वकील
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FACT CHECK : इशान किशन, अभिषेक शर्मा यांचा SRH कडून IPL 2026 खेळण्यास नकार? काव्या मारनचा नोंदवला निषेध... जाणून घ्या सत्य

MS Dhoni त्याची आवडती ७ क्रमांकाची जर्सी सोडणार? फेसबूक पोस्टने खळबळ, रवींद्र जडेजाच्या जाण्याने नाराज असल्याची चर्चा

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा का साजरा केला जातो माहीत आहे? जाणून घ्या सणाचा इतिहास आणि महत्त्व

Latest Marathi News Live Update : ऑनलाइन शॉपिंग पडली महागात ! महिलेची 98000ची फसवणूक

"सगळा एडिटचा खेळ" करणसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर प्राजक्ताने सोडलं मौन ; "आमच्या दोघांमध्ये.."

SCROLL FOR NEXT