पुणे, ता. १९ : लोकमान्य टिळकांनी दिलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या तत्त्वांना अनुसरून झगडेवाडीतील तरुणांनी १९३१ साली ‘झगडेवाडी मित्र मंडळाची’ स्थापना केली. गेली ९३ वर्षे हे मंडळ सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक बांधिलकीचे व्रत निष्ठेने पार पाडत असून, यंदा मंडळाचा ९४ वा गणेशोत्सव साजरा होणार आहे. वार्षिक गणेशोत्सवासह विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांतून हे मंडळ परिसरात ऐक्य, संस्कार आणि समाजाभिमान जपण्याचे काम करत आहे. या मंडळाचा कोणीही अध्यक्ष, वरिष्ठ नसून सर्वजण कार्यकर्ता म्हणून मंडळासाठी कार्यरत आहेत.
स्वारगेटपासून हाकेच्या अंतरावर वसलेला झगडेवाडी परिसर ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. या भागात १८ व्या शतकात उभारलेले प्राचीन मारुती मंदिर आहे. ‘गाव तिथे वेस’ आणि ‘वेस तिथे मारुती’ या परंपरेनुसार मंदिर प्रस्थापित केले असून, दगडी आणि रेखीव मारुती मूर्ती आहे. याच मंदिरात विठ्ठल-रखुमाई, नवग्रह, महादेव पिंड, नागदेवता, श्री गणेश आणि द्वारपाल अशा अनेक प्राचीन मूर्तींचा समावेश आहे. भजन-कीर्तन, काकडा आरती, सप्ताह, उटी महोत्सव हे धार्मिक कार्यक्रम येथे साजरे होतात. हनुमान जयंती, शनी जयंती यासारखे उत्सवही साजरे केले जात असून, धार्मिक उपक्रमांसोबतच सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पार पडते. सेवा आणि त्याग या तत्त्वांनुसार मंडळामार्फत विविध सामाजिक कार्यक्रम, उपक्रम आणि सेवा प्रकल्प राबवले जातात.
सामाजिक कार्य
- सातत्याने राबविलेले रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिर
- वृक्षारोपण कार्यक्रम
- १५ ऑगस्टला सफाई कामगारांच्या हस्ते ध्वजवंदन आणि रक्षाबंधनाचा सोहळा
- पूरग्रस्तांना अत्यावश्यक वस्तूंची मदत
- नवरात्रोत्सवानिमित्त झगडेवाडी परीसरातील भाविक महिला-भगिनींसाठी एकवीरा देवी दर्शन, प्रति पंढरपूर आणि प्रतिशिर्डी दर्शन सहल
- गावातील विविध समस्या सोडविण्याकरता गाव दत्तक घेणे
पदाधिकारी
सुमेध कोल्हे, मयूर पवार, स्वप्नील यादव, राकेश पोकळे, प्रमोद कुदळे, प्रतीक बनकर, मकरंद विधाते, सुधीर यादव, किरण अभंग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.