पुणे

पुरामुळे पंधराशे नागरिकांचे स्थलांतर पुणे महापालिका सतर्क ः नदी काठच्या वस्त्यांना पुराचा फटका

CD

पुणे, ता. २० ः खडकवासला प्रकल्प आणि पवन धरण, मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा मुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आल्याने पुणे शहरात पूरस्थिती निर्माण झाली. एकतानगरी, पुलाची वाडी, खिलारेवाडी, तपोधाम, मंगळवार पेठ, पाटील इस्टेट, येरवड्यातील शांतिनगर, ताडीवाला रस्ता यासह अन्य भागात पाणी शिरल्याने तेथील ४०४ कुटुंबातील १ हजार ४९८ नागरिकांना पुणे महापालिकेने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील पथक व आपत्ती व्यवस्थापन विभाग पूरस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.
गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरासह खडकवासला, पानशेत, टेमघर, वरसगाव, मुळशी, पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यातील पाऊस दुपारपासून थांबलेला असला तरी घाटमाथ्यावर पावसाचा जोर आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये येणारा पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आलेला नाही. आज दिवसभर खडकवासला धरणातून ३९ हजार १३८ क्यूसेस पाणी मुठा नदीत सोडले जात होते. पवना धरणातून १५ हजार क्यूसेस आणि मुळशी धरणातून ३१ हजार क्यूसेस पाणी सोडले जात होते. त्यामुळे पुणे शहरातील मुळा-मुठा या दोन्ही नद्यांना पूर आल्याने नदी काठच्या वस्त्यांना त्याचा फटका बसला.

महापालिका सतर्क
पावसाचा जोर कायम असल्याने मंगळवारी रात्री एकतानगर, रजपूत वस्ती या भागात पाणी घुसले होते. त्यामुळे महापालिका सतर्क होती. आज सकाळी दहापासून मुठा नदीतील विसर्ग ३९ हजारावर गेल्यानंतर वस्ती भागात पाणी घुसले. नागरिकांना पूर येणार असल्याची पूर्वकल्पना देण्यात आल्याने त्यांना घरातील वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. तरीही काही घरातील अवजड वस्तू हलवता आल्या नाहीत. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेता यावे, यासाठी महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अधिकारी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशामक दलाचे जवान, पीएमआरडीए कर्मचारी तैनात होते. आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास एकतानगर भागात जाऊन पाहणी केली होती. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी आज (ता. २०) सकाळी रजपूत झोपडपट्टी परिसरात जाऊन पाहणी केली.


अशी केली व्यवस्था
मुळा- मुठा नदीला आलेल्या पुरामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, निंबजनगर, तसेच ताडीवाला रस्ता, शांतिनगर झोपडपट्टी (येरवडा), चिमा गार्डन, फुलेनगर, वडगाव शेरीतील साईनाथ नगर, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, तपोधाम व बोपोडीतील आदर्शनगर या भागांमध्ये पाणी शिरले. पूरग्रस्त नागरिकांच्या निवाऱ्याची आणि भोजनाची व्यवस्था पुणे महापालिकेच्या विविध शाळांमध्ये करण्यात आली.
- येरवडा कळस क्षेत्रीय कार्यालयाने नानासाहेब परुळेकर शाळेत १७२, वि. ग. घाटे शाळेत २४३ आणि चिमा गार्डन पर्णकुट येथे १४ नागरिकांची सोय केली.
- नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाने साईनाथनगर येथील ४६ नागरिकांना खराडीतील सारथी शाळेत हलवले.
- औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयाने ५२ पूरग्रस्तांना राजेंद्र प्रसाद शाळा, बोपोडी (आदर्शनगर) येथे स्थलांतरित केले.
- कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने नागझरी नाला, मंगळवार पेठ आणि भीमनगर येथील ८७ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेले.
- शिवाजीनगर-घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने पाटील इस्टेटमधील २७७ नागरिकांना वाकडेवाडी येथील आंबेडकर शाळेत आणि २५९ नागरिकांना शाळा क्रमांक ४७ (न.ता.वाडी) येथे हलविले.
- ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाने ताडीवाला रोडवरील १७० पूरग्रस्तांना कै. शांताबाई ढोले पाटील शाळा व महात्मा फुले शाळा (ढोले पाटील रस्ता) येथे राहण्याची व्यवस्था केली.
- सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एकतानगरातील येथील ३५ नागरिक नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेले
- वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाने रजपूत वस्ती येथील १०९ जणांची व्यवस्था अनसूयाबाई खिलारे शाळेत केली, तर तपोधाम
येथील ३४ नागरिकांची व्यवस्था चौधरी शाळेत केली.

पुरामुळे हे पूल झाले बंद
नदीला आलेल्या पुरामुळे शहरातील चार पूल बंद होते.
- जयंतराव टिळक पूल
- शिवणे रस्ता
- नांदेड सिटी
- रजपूत वस्ती ते टिळक पुलापर्यंतचा नदी काठचा रस्ता


आपत्ती व्यवस्थापनासाठी तयारी
-महापालिकेकडून ७१ मदत केंद्रे उभारण्यात आली; त्यापैकी ३३ केंद्रे पूरग्रस्त भागाजवळ कार्यरत
- सर्व केंद्रांवर महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालयामार्फत रेस्क्यू टीम नियुक्त
- नजीकच्या ठिकाणीही अतिरिक्त मदत केंद्रांची स्थापना
- आपत्ती व्यवस्थापन कक्ष २४ तास कार्यरत
- सिंचन विभागाच्या नियंत्रण कक्षात महापालिकेचे कनिष्ठ अभियंते नियुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT