पुणे

पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार

CD

पुणे, ता. २० ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी गुरुवारी (ता. २०) जाहीर झाली असून, एकूण ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार मतदान करू शकणार आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक नऊ सूस-बाणेर-पाषाण हा सर्वाधिक एक लाख ६० हजार २४२ मतदारांचा आहे. तर सर्वांत कमी ६२ हजार २०५ मतदार हे प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर इंदिरानगर येथे आहेत. एकूण ४१ प्रभागांपैकी १० प्रभागांमधील मतदारसंख्या ही एक लाखाच्या पुढे आहे. त्यामुळे येथील उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.
पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असून, त्यातील आरक्षित प्रभागही निश्‍चित झालेले आहेत. त्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. प्रारूप मतदार यादी करताना अनेकदा एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात जातात. त्यावरून मोठा गोंधळ होतो. मतदारांची विभागणी झाल्याने उमेदवारांना मोठी राजकीय किंमत मोजावी लागते. त्यामुळे प्रारूप मतदारयादी करताना महापालिकेचे कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत की नाही, यावर लक्ष ठेवून असतात. तर प्रारूप मतदारयादी जाहीर झाल्यानंतर मतदारयादीतील नावे तपासली जातात. चुकीची नावे घुसली असतील तर हरकत घेता येते.
निवडणूक आयोगाने प्रारूप मतदारयादी करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर आयुक्त नवलकिशोर राम यांनी गुरुवारी ही प्रारूप मतदारयादी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी एक जुलै २०२५पर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी पात्र असणार आहे. यानुसार ४१ प्रभागांमध्ये ३५ लाख ५१ हजार ४६९ इतके मतदार आहेत. प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज हा प्रभाग पाच सदस्यांचा असला तरी या ठिकाणची मतदारसंख्या ही एक लाख ४८ हजार इतकी आहे. पण यापेक्षा जास्त मतदारसंख्या ही प्रभाग क्रमांक ९ सूस-बाणेर-पाषाण या प्रभागाची आहे. येथील मतदारसंख्या तब्बल एक लाख ६० हजार इतकी आहे.

एकत्रित हरकतींवर हरकत
प्रारूप मतदारयादीतील मतदारांवर हरकत असेल तर नागरिकांना वैयक्तिक तक्रार करता येतील किंवा दोन सोसायट्यांमध्ये विभागणी झाली असेल तर सोसायटीचे अध्यक्ष, सचिव हे त्यांची लेखी हरकत नोंदवू शकतील. राजकीय कार्यकर्त्यांना एकत्रितपणे हरकत नोंदविता येणार नाही. त्यामुळे प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले असतील तर संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांना हरकत नोंदविण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

तीन लाख दुबार मतदार
शहरात ३५ लाख ५१ हजार मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख ४६८ दुबार मतदार आहेत. हे मतदार शोधण्यात आले आहेत. त्यांच्या नावापुढे दोन स्टार करण्यात आलेले आहे. या मतदारांना महापालिकेचे कर्मचारी भेटून त्यांना कोणत्या तरी एका ठिकाणी मतदार करायला सांगतील. त्यासाठी त्यांच्‍याकडून तसा अर्ज भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे एक मतदार दोन ठिकाणी मतदार करू शकणार नाही, असे नवलकिशोर राम यांनी सांगितले.

हे लक्षात ठेवा
- प्रारूप मतदारयादीवर हरकती सूचना दाखल करण्यासाठी अंतिम तारीख : २७ नोव्हेंबर २०२५
- हरकतींचा विचार करून अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे : ५ डिसेंबर २०२५
- मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदानयादी जाहीर करणे : ८ डिसेंबर २०२५
- मतदान केंद्रनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करणे : १२ डिसेंबर २०२५

प्रभाग आणि मतदार संख्या
प्रभाग क्रमांक १ कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित
१०५७१३
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर-नागपूरचाळ
७८६२६

प्रभाग क्रमांक ३ विमाननगर-लोहगाव
१०७०२८
प्रभाग क्रमांक ४ खराडी-वाघोली
१२४६६७
प्रभाग क्रमांक ५ कल्याणी नगर-वडगाव शेरी
८२१३२
प्रभाग क्रमांक ६ येरवडा-गांधीनगर
७२५०७
प्रभाग क्रमांक ७ गोखले नगर-वाकडेवाडी
८०४५१
प्रभाग क्रमांक ८ औंध-बोपोडी
९०७९९
प्रभाग क्रमांक ९ सुस-बाणेर-पाषाण
१६०२४२
प्रभाग क्रमांक १० बावधन भुसारी कॉलनी
७९२७८
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर
७०६०५
प्रभाग क्रमांक १२ शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी
७२४८०
प्रभाग क्रमांक १३ पुणे स्टेशन-जयजवान नगर
७६१३६
प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी मुंढवा
७१८१९
प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी
१११७३५
प्रभाग क्रमांक १६ हडपसर-सातववाडी
९१४२२
प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी-माळवाडी वैदुवाडी
८२०४४
प्रभाग क्रमांक १८ वानवडी-साळुंखे विहार
७११३८
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द-कौसरबाग
१०२५५३
प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ-बिबवेवाडी
६५०६१
प्रभाग क्रमांक २१ मुकुंद नगर-सॅलिसबरी पार्क
६९१२२
प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी-डायस प्लाॅट
७३००२
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ-नाना पेठ
७९७२६
प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती-कमला नेहरू रुग्णालय-केइएम रुग्णालय
७०७०७
प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ-महात्मा फुले मंडई
७१७६५
प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी
६७००८
प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ-पर्वती
७०८३८
प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत-हिंगणे खुर्द
७३१०४
प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना-हॅपी कॉलनी
६८६६८
प्रभाग क्रमांक ३० कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी
६९२११
प्रभाग क्रमांक ३१ मयूर कॉलनी-कोथरूड
८१४४९
प्रभाग क्रमांक ३२ वारजे-पॉप्युलर नगर
८७४३८
प्रभाग क्रमांक ३३ शिवणे-खडकवासला-धायरी पार्ट
११४८८२
प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे वडगाव-बुद्रुक धायरी
१०४७९८
प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी-माणिकबाग
६९८०२
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर-पद्मावती
७९९२५
प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी-कात्रज डेअरी
७४५१९
प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव कात्रज
१४८७६९
प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर-इंदिरानगर
६२२०५
प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी
९८९१३
प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी-उंड्री
११९१६७

एकूण मतदार
३५५१४६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT