पुणे

अनिल खवटे, महेश मांजरेकर यांना ‘जागतिक मराठी अकादमी’चे पुरस्कार

CD

पुणे, ता. २० ः ‘जागतिक मराठी अकादमी’तर्फे दिला जाणारा ‘जागतिक मराठी भूषण पुरस्कार’ गोव्यातील ज्येष्ठ उद्योजक अनिल खवटे यांना, तर दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांना ‘मराठी जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर हे संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत, अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी गुरुवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली.
पणजी येथे ९ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान अकादमी आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे जागतिक संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनाचे उद्‍घाटन नऊ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याच संमेलनात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. अकादमीतर्फे दिले जाणारे हे मानाचे सन्मान उद्योग, संस्कृती व कलाक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाला दिलेली संस्थात्मक दाद आहे. डॉ. काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरणाऱ्या संमेलनात जगभरातील कर्तबगार मराठी बांधवांच्या उपस्थितीत या दोन्ही मान्यवरांचा गौरव होणार आहे, असे फुटाणे म्हणाले. अकादमीच्या कार्यकारिणीचे सदस्य महेश म्हात्रे, संमेलन कार्यवाह गौरव फुटाणे आणि संजय ढेरे पत्रकार परिषदेस उपस्थित होते. तीन दिवसांच्या संमेलनात कर्तबगार मराठी व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांच्या मुलाखती घेऊन, त्यांचा जीवनप्रवास समजून घेतला जाईल. याशिवाय, गोव्यातील स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रमदेखील होतील.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Mahur Crime : गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता!

Naval Kishor Ram : कितीही मोठा अधिकारी असला तरी कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा

SCROLL FOR NEXT