पुणे

निलंबन मागे घेण्यासाठी अभियंता संघाकडून प्रयत्न

CD

पुणे, ता. २० ः वारजेमध्ये निकृष्ट दर्जाचे रस्ते केल्याने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दोन अभियंत्यांचे निलंबन केले. पण त्यांचे निलंबन मागे घेण्यासाठी अभियंता संघाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यावर आयुक्तांनी खड्डेमुक्त अभियान सुरू असताना चांगल्या दर्जाचे काम झाले पाहिजे. जर काम व्यवस्थित करणार नसाल तर कितीही मोठा अधिकारी असला तरी त्यावर मी कारवाई करणार, असा इशारा दिला आहे.
वारजे येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता. नागरिकांनी या कामावर टीकेची झोड उठविल्याने आयुक्तांनी दोन अभियंत्यांना निलंबित केले आहेत. आयुक्तांनी केलेल्या या कारवाईमुळे अभियंत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गुरुवारी अभियंता संघाचे सचिव सुनील कदम यांनी आयुक्तांची भेट घेऊन दोन अभियंत्यांचे निलंबन मागे घ्यावे, अशी मागणी केली व कामाच्या ठिकाणी आलेल्या अडचणींचा पाढा आयुक्तांसमोर वाचला. यावेळी आयुक्तांनी मला कारवाई करताना आनंद होते असे नाही, पण जर व्यवस्थित काम केले नाही तर कारवाई होईल, असे सांगितले.
दरम्यान यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘‘शहराचा विकास करण्यासाठी माझी नियुक्ती झाली आहे. कोणाचे निलंबन करण्यासाठी मी इथे आलेलो नाही. माझ्या हस्ते खड्डेमुक्त अभियानाचे उद्‍घाटन झालेले असताना जर चांगल्या पद्धतीने काम होणार नसेल तर मग कितीही मोठा अधिकारी असू द्या मी त्यांच्यावर कारवाई करणार. काही समाजकंटक अधिकाऱ्यांवर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने काम करून घेत असतील तर त्याची तक्रार आमच्याकडे करा, पोलिसांना बोलावून घ्या. पण सगळी कामे चांगली दर्जाची झाली पाहिजेत.’’
वारजे येथे निकृष्ट दर्जाचे काम केल्या निलंबित केलेल्या अभियंत्यांची परिमंडळ तीनचे उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सांगितले.

पाच अभियंते निलंबित
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पाच अभियंत्यांचे निलंबन केले आहे. यामध्ये मलनिस्सारण विभागाचा एक, बांधकाम विभागाचे दोन आणि पथ विभागाचे दोन अभियंते आहेत. आयुक्तांचे शहरात पाहणी दौरे सुरू आहेत. त्यावेळी त्यांना रस्ते, मलनिस्सारण, अतिक्रमण, अवैध बांधकाम दिसल्यानंतर संबंधित अभियंत्यांकडे चौकशी केली जात आहे. पण त्यावर समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने ही कारवाई झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका आमदारांनी अभियंत्याचे निलंबन मागे घ्यावे यासाठी भेट घेतली होती. त्यांना थेट नकार कळविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Well Accident : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! 70 फूट खोल विहिरीत 25 टन वजनाचे पोकलँड कोसळले; विहिरीत बुडणाऱ्या मित्रासाठी ऑपरेटरने..., VIDEO पाहा

Latest Marathi News Live Update : बदलापूर स्त्री बीज तस्करी प्रकरण : नाशिकमधील डॉ. अमोल पाटीलला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणी संतापल्या! केवायसी करूनही मिळेनात पैसे; पात्र-अपात्रतेबाबत गोंधळ, लाभार्थी महिलांचे बँकांत हेलपाटे..

तेलसाठा संपला तर काय? भारतासमोर रशियाचा पर्याय पण अमेरिकेची भीती; कराराची अट अडचणीची

Pune News: सांत्वन नको; आम्हाला ठोस मदत करा; दुबईत अडकलेल्या पर्यटकांची मागणी, सरकारकडून केवळ चौकशीचे फोन!

SCROLL FOR NEXT