पुणे

ॲमेझॉनवर विका स्वतःची उत्पादने

CD

पुणे, ता. २२ : ॲमेझॉनवर उत्पादन विकायचे असेल तर त्याची प्रक्रिया काय आहे, नोंदणी कशी करावी, कोणते कागदपत्रे लागतात, किती दिवस लागतात, हे सर्व करून बिझनेस कसा वाढवायचा, ॲमेझॉनवर विक्री करण्यास किती खर्च लागतो, सेलर पोर्टल कसे असायला हवे आदींबाबत प्रात्याक्षिकासह मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा २९ नोव्हेंबरला आयोजिली आहे. कार्यशाळेत उत्पादन कसे लिस्ट करावे, डिलिव्हर करावे, रिटर्न्स असतील तर ते कसे हाताळावे, ॲमेझॉन ॲपवरती उत्पादन जास्तीत जास्त कसे दिसतील जेणेकरून विक्री वाढेल, सवलती कशा ठेवायच्या, उत्पादन स्पॉन्सर कसे करायचे, पेमेंट कसे पाहायचे, तत्काळ सपोर्ट कसा घ्यायचा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

व्यावसायिक चाट, स्नॅक्स कार्यशाळा
चटपटीत चाट व स्नॅक्सचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास नेमकी काय पूर्वतयारी करावी याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ आणि ३० नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये स्पेशल मिसळ, कटवडा, शाबू वडा, उपवासाचे पॅटीस व मिसळ, व्हेज बॉल्स, चीज कटलेट, वेगवेगळ्या पद्धतीच्या चटण्या व पराठ्याचे प्रकार कसे करावेत हे प्रात्यक्षिकासह शिकवले जाणार आहे. तसेच चाट स्पेशल पदार्थांमध्ये गोड व हिरवी चटणी, पाणीपुरी, आलू दहीपुरी, रगडा पॅटीस, मटकी भेळ, कोल्हापुरी स्पेशल भेळ, आलू टिक्की चाट, पकोडा चाट, इडली चाट, कॉर्न चाट, चना चाट, पापड चुरी चाट, पापडी चाट, दही वडा इत्यादी पदार्थ शिकवले जातील. व्यवसायाची सुरुवात, नोंदणी, ब्रॅण्डिंग, अन्न सुरक्षा मानके आदींबाबत माहिती दिली जाईल.

शासकीय ई-निविदा प्रक्रिया प्रशिक्षण
विविध शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक विश्वस्त संस्था, देवस्थाने आता ई-निविदा प्रक्रिया राबवत आहेत. याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणारे प्रशिक्षण २९ व ३० नोव्हेंबरला आयोजिले आहे. प्रशिक्षणात विविध विभागातील नोंदणी, निविदा कशा शोधायच्या, बीओक्यू भरताना येणाऱ्या अडचणी, कागदपत्रे, डिजिटली सही सादरीकरण, ईएमडी व एसडीमध्ये सूट कशी मिळवायची, भाडेकरार, निविदापूर्व बैठकीला जाण्यापूर्वी करावयाच्या १५ महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या याबाबत तसेच इतर महत्त्वाच्या तांत्रिक गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन होणार आहे.

पॅकेजिंग तंत्रज्ञान उद्योग कार्यशाळा
प्रक्रिया केलेले सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ, शेतमाल असो वा दूध किंवा पाणी अशा सर्व प्रकारच्या उत्पादनांची पॅकिंग करण्यासाठी पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लॅस्टिक इ.विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल लागत असून बाजारात याची प्रचंड मागणी आहे. हे मटेरिअल कसे तयार करतात, त्यासाठी कोणती अद्ययावत यंत्रे लागतात, भांडवल इ.विषयी सविस्तर माहिती करून देणारा ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम १७ जानेवारीपासून सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, विविध प्रकारच्या मटेरिअलची ओळख, यंत्रे, छोटे पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचे आहे तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे इ. साठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे.
संपर्क : ८४८४८११५४४, ९३५६९७३४२७, ८९५६३४४४७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

Toll Tax Rule Change : सरकारने बदलला टोल नियम!, आता अपूर्ण ‘एक्सप्रेस-वे’वर नाही होणार वसूली

Pune News : आयफोन विमा दावा नाकारल्याप्रकरणी ग्राहक आयोगाचा मोठा निर्णय; ८९ हजार परत करण्याचे आदेश

IND vs NAM : ७ षटकांत १०४ धावा चोपणारा भारत २०९ वर का अडकला? India vs Pakistan लढतीपूर्वी चिंता वाढवणारी गोष्ट

T20 WC IND vs NAM : इशान किशन, हार्दिक पांड्या बरसले, भारताने अनेक विक्रम नोंदवले; शेवटच्या १२ चेंडूंत ५ विकेट्स पडल्या

SCROLL FOR NEXT