पुणे

उसाची वजनचोरी रोखण्यासाठी पथके

CD

पुणे, ता. २२ : उसाची वजन चोरी आणि साखर उतारा चोरीबाबतच्या तक्रारींची चौकशी केली जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेले भरारी पथके कार्यान्वित करून तपासण्या करण्याच्या सूचना प्रादेशिक साखर सहसंचालकांना दिल्या आहेत, अशी माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली.
साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, प्रतिनिधींसमवेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक झाली. यामध्ये उसाच्या वजनातील काटामारी आणि साखर उताऱ्यात होणाऱ्या चोरीबाबत शेतकऱ्यांनी तक्रारींचा पाढा वाचला. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शेतकरी संघटनांनी डॉ. कोलते यांच्याकडे संयुक्त केली. दरम्यान, महसुली उत्पन्न विभागणी सूत्रांनुसार (आरएसएफ), हिशेब देणे बंधनकारक असतानाही कारखान्यांनी गतवर्षीचा अहवाल अद्याप दिलेला नाही. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. वजन चोरीसाठी भरारी पथकात आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीला घेण्यावर एकमत झाले आहे.
या बैठकीला साखर संचालक डॉ. केदारी जाधव, यशवंत गिरी, पुणे विभागाचे विशेष लेखापरीक्षक पांडुरंग मोहोळकर, सहसंचालक महेश झेंडे, जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे बाबासाहेब देवकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, सरकारने जारी केली ही महत्त्वाची नोटीस

Solapur News: २० टक्के प्रमाणपत्रे खोटी! साेलापूरात कामगारांना अनुभव प्रमाणपत्र देणारे ठेकेदारही बोगस;'कामगार मंडळा’कडून तपास सुरू..

Ajay Devgn: ‘शैतान २’चा इशारा? दोन वर्षांनंतर अजय देवगच्या पोस्टने चाहत्यांची उत्सुकता वाढवली!

Success Story: आदिवासी युवकाची मेळघाटातून ब्रिटनपर्यंतची झेप; चिलाटी येथील किशोर बेठेकर यांना ब्रिस्टल विद्यापीठात प्रवेश

Latest Marathi News Live Update : कुडाळच्या पिंगुळी बाजारपेठेत बनावट भांडी विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT