पुणे

कारवाईच्या भीतीने महिलेची ३५ लाखांची फसवणूक

CD

पुणे, ता. २३ : गैरव्यवहार करण्यात बँक खात्याचा वापर झाला असून तपास यंत्रणांकडून तुमच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सदाशिव पेठेतील एका ज्येष्ठ महिलेची ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
याप्रकरणी सायबर चोरट्यांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७० वर्षीय ज्येष्ठ महिला सदाशिव पेठेत राहायला आहे. ११ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला. काळा पैसा व्यवहारात बँक खात्याचा वापर करण्यात आला असून, याप्रकरणात कारवाई करणार असल्याची भीती दाखवून चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून चोरट्यांनी ३५ लाख रुपये स्वत:च्या खात्यात जमा करून घेतले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे तपास करत आहेत.

एफडी मिळवून देण्याच्या
बतावणीने फसवणूक
बँकेतील मुदतठेव योजनेत गुंतविलेली रक्कम परत मिळवून देण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची चार लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ७२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेने एका बँकेत मुदतठेव योजनेत पैसे गुंतविले होते. महिलेला मुदतठेव योजनेत गुंतवलेली रक्कम परत पाहिजे होती. महिलेने बँकेचा मोबाइल क्रमांक संकेतस्थळावरून घेतला. मात्र संकेतस्थळावरील संपर्क क्रमांकावर फेरफार करण्यात आली होती. सायबर चोरट्यांनी मुदतठेव योजनेत गुंतविलेली रक्कम परत करण्याचे आमिष दाखविले. महिलेच्या बँक खात्याची माहिती घेतली. या माहितीचा गैरवापर करून पावणेपाच लाख रुपये स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब निकम तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT