पुणे

महाबोधी विहारासाठी दिल्लीत राष्ट्रीय परिषद

CD

पुणे, ता. २५ : बिहार येथील बोधगया महाबोधीविहार बौद्ध धर्मीयांच्या व्यवस्थापनाखाली असावे, अशी मागणी जगभरातील बौद्ध समाजबांधवांकडून करण्यात येत आहे. या मागणीच्या अनुषंगाने एक एप्रिलला दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याद्वारे पंतप्रधानांची भेट घेतली जाणार असल्याची माहिती ‘नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी’तर्फे आयोजित पत्रकार परिषदेत राहुल डंबाळे आणि डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली.
या वेळी माजी नगरसेवक राहुल तुपेरे, अनिता धिमधिमे, सोनिया ओव्हाळ, राहुल नागटिळक, किरण सोनावणे उपस्थित होते. डंबाळे म्हणाले, ‘‘देशभरातील आंदोलकांना एकत्र आणून व्यापक विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेत देशभरातील बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधींसह खासदार वर्षा गायकवाड, बळवंत वानखेडे, चंद्रकांत हंडोरे, तमिळनाडूचे खासदार थोल थिरूवलन, डी. राजकुमार, तसेच दिल्लीचे माजी मंत्री राजेंद्र पाल गौतम आदी मान्यवर सहभागी होणार आहेत. या परिषदेतून बौद्ध समाजाच्या मागण्यांसाठी ठोस भूमिका घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : ठाण्यात अपघाताचा थरार, कार डिव्हायडरला धडकली

Billionaires: वयाच्या 22 व्या वर्षीच भारतीय पठ्ठाने मोडला मार्क झुकरबर्गचा विक्रम! बनला जगातील सर्वात तरुण सेल्फ-मेड अब्जाधीश

SCROLL FOR NEXT