पुणे

रमजान

CD

हजरत पैगंबर : प्रत्येक मुस्लिम
देशाभिमानी असला पाहिजे

डॉ. एस. एन. पठाण (माजी कुलगुरू)
‘स्वदेशाभिमान हा धर्माचा एक भाग आहे’ अशी हजरत महंमद पैगंबरांची शिकवण आहे. ज्या देशात आपण जन्मलो, त्या देशाच्या कल्याणाची काळजी वाहिल्याखेरीज किंवा त्या देशाची सेवा केल्याखेरीज आपला धर्म परिपूर्ण होत नाही, अशी हजरत पैगंबरांनी घोषणा करून प्रत्येक मुस्लिम देशाभिमानी झाला पाहिजे, अशी आज्ञा केली आहे. पण, हजरत पैगंबरांचा स्वदेशाभिमान हा साऱ्या जगाच्या विरुद्ध नाही. त्यांच्या स्वदेशाभिमानाच्या पोटी इतर राष्ट्रांविषयी बेपर्वाई नसून, आपुलकी आहे.
माझ्या राष्ट्राप्रमाणेच जगातील सर्व राष्ट्रांवर प्रेम करण्याचा आपला हक्क आहे. या उदात्त विचारसरणीचा अवलंब हजरत पैगंबरांच्या स्वदेशाभिमानाने केला. त्यांच्या स्वदेशाभिमानाचा अंतर्भाव विश्वबंधुत्त्वाच्या परिघात होतो. आपल्या राष्ट्रावर प्रेम करूनही इतर राष्ट्रांवर आपण प्रेम करू शकतो, हे हजरत पैगंबरांच्या स्वदेशाभिमानाने उत्कृष्ट रीतीने सिद्ध केले आहे. थोडक्यात आपणास असे म्हणता येईल की, आंतरराष्ट्रीय स्वदेशाभिमानाचा धडा हजरत पैगंबरांनी आपल्या लोकशाहीस घालून दिला.
हजरत पैगंबरांचे धोरण कुणावरही अत्याचार करणारे नव्हते. ‘लढाईच्यावेळी स्त्रिया, मुले आणि वृद्ध नागरिकांना काडीमात्र दुखवू नका किंवा त्यांचा छळ करू नका’, असे ते आपल्या सैनिकांना स्पष्ट हुकूम देत. एखाद्या सैनिकाने चुकून हुकुमाचा भंग केला, तर त्यांना अत्यंत वाईट वाटत असे. ज्या नागरिकाला त्रास होईल, त्याला आपुलकीने बोलावून सैनिकाने केलेल्या अपराधाबद्दल ते स्वतः दिलगिरी प्रदर्शित करीत. तसेच, त्या नागरिकाला नुकसानभरपाई देत.
आपल्याप्रमाणेच दुसऱ्यावर अत्याचार न करण्याची वृत्ती आपल्या अधिकाऱ्यांच्या अंगी बाणावी, याबद्दल ते फार दक्ष असत. ज्यावेळी हजरत पैगंबरांनी ‘महजबिन-जबलची’ यमनचे गव्हर्नर म्हणून नेमणूक केली, त्यावेळी त्याला हजरत पैगंबरांनी पुढीलप्रमाणे उपदेश केला.
‘तुम्ही प्रजाजनास अत्यंत दयाळूपणाने आणि विचाराने वागवले पाहिजे. तुम्ही त्यांच्याशी कठोरपणाने वागता कामा नये किंवा त्यांची संपत्ती लुटता कामा नये. दुःखितांचा शाप आपणास भोवतो, हे नीट लक्षात ठेवा. त्रस्त लोकांचे सुस्कारे परमेश्वरचरणी लवकर रुजू होतात, या गोष्टीची आठवण असू द्या.’ हजरत पैगंबरांचा देशाभिमान आणि शत्रूबद्दलचा दयाळूपणा मुस्लिमांच्यामध्ये यावयास नको का?

(लेखक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)

इफ्तार वेळ : ६.४९ (बुधवारी सायंकाळी)
सहेरी वेळ : ५.१६ (गुरुवारी सकाळी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli BJP vs Congress politics : सांगली जिल्ह्यात भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसचा गणिमी कावा; मिरजमध्ये भाजपला दूर ठेवण्यासाठी सर्वच एकवटले

Shivam Dube: साधेपणा pro-max! वर्ल्डकप जिंकून देणारा शिवम दुबे चक्क रेल्वेने घरी, नेटकऱ्यांनी केला सलाम

Latest Marathi News Live Update : विधानभवनाबाहेर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Chandoli Forest Leopard Sighting : सांगलीच्या चांदोलीत वाघांनंतर आता 'या' दुर्मिळ पाहुण्याची एन्ट्री; सफारीदरम्यान पर्यटकांना मिळालं खास सरप्राईज!

SSC Exam Paper Leak : दहावीचा गणिताचा पेपर तीन दिवस आधीच फुटला, टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका व्हायरल, बोर्डाच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिह्न

SCROLL FOR NEXT