पुणे

वैभव देशमुख यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन

CD

पुणे, ता. २५ ः गझलकार आणि कवी वैभव देशमुख यांच्या ‘हे सारे गुलमोहर माझे’ या गझल संग्रहाचे आणि ‘तृष्णाकाठ’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन दिग्दर्शक-अभिनेते नागराज मंजुळे यांच्या हस्ते झाले.

‘न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस’तर्फे आयोजित कार्यक्रमात सुरेश भट गझल मंचाचे संस्थापक शाहीर सुरेशकुमार वैराळकर, कवी व गझल अभ्यासक चित्तरंजन भट, मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरचे कार्यक्रम संचालक दत्ता बाळसराफ, मराठवाडा आर्ट, कल्बर आणि फिल्म फाउंडेशनचे संचालक नीलेश राऊत, लेखक शरद तांदळे, प्रकाशिका अमृता तांदळे आदी उपस्थित होते.
‘‘माणसाला कवितेची ओळख व्हायची असेल, तर आधी दुःखाची ओळख व्हावी लागते. कविता माणसाच्या जीवनाला आकार देते. आपण दगड आहोत, याचा अहंकार बाळगून उपयोग नसतो. कारण कवितेत दगडलाही छेदण्याची ताकद असते,’’ असे मत मंजुळे यांनी व्यक्त केले. वैभव देशमुख यांनी निवडक गझल आणि कवितांचे सादरीकरण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs NZ Semi: दक्षिण आफ्रिकेसोबत चिटिंग झाली? एडन मार्करमची विकेट ढापली? 'त्या' कॅचवरून वाद पेटला Video

Latest Marathi News Live Update : नोकरीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक

Ladki Bahin Yojana : केवायसी करूनही मिळेना लाडक्या बहिणींना दरमहा अनुदान

Iran-Israel War: इराणच्या युद्धात मुंबईच्या तरुणाचा मृत्यू; ड्रोन हल्ल्यात भारतातील तिघे ठार

Mumbai News: व्हॉट्सॲप चॅट घटस्फोटाचे कारण असू शकत नाही - उच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT