पुणे

रस्ते, पाणी, स्वच्छतेकडे पालिकेने लक्ष देण्याची मागणी

CD

पुणे, ता. २५ : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी, पथदिवे, कचरा, स्वच्छतागृहांसंबंधी समस्या आहेत, मात्र महापालिका प्रशासनाकडून संबंधित प्रश्‍न सोडविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित प्रश्‍न तातडीने सोडविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे पालिकेकडे करण्यात आली आहे.
शिवाजीनगर, खडकी, बोपोडी, खडकी रेल्वे स्थानकाजवळील बोगदा, नदीपात्र अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. शाळांजवळील रस्त्यांवर शास्त्रीय पद्धतीचे गतिरोधक, झेब्रा पट्टे नसल्याने अपघाताच्या घटना घडूनही दुर्लक्ष केले जात आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित प्रश्‍न सोडविण्याबरोबरच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब आहेर, अध्यक्ष डॉ. अभिषेक बोके, महिला विभागाच्या अध्यक्ष नूतन गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

Tax Benefits: पगारातून Tax वाचवायचा सोपा फंडा! हे 7 भत्ते घेतले तर कर जवळपास शून्य; जाणून घ्या अगदी सोप्या शब्दांत

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

"त्यांच्या मुलाला.." अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या Viral Video नंतर उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

SCROLL FOR NEXT