पुणे

ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने ‘जिप’मध्ये उधळल्या नोटा

CD

पुणे, ता. २५ ः जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा करीत मावळ तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने मंगळवारी (ता. २५) जिल्हा परिषदेत नोटा उधळल्या. परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.
अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते खडकाळा ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराजवळ नोटा उधळल्यानंतर दुपारी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
सिरसाट यांनी गळ्यात नोटांचा हार घातला होता. ‘मी न्याय मागतोय त्याला तीन वर्षे झाली, पण एकाही अधिकाऱ्याने न्याय दिला नाही. अधिकारी मुजोर आहेत. हे मिनी मंत्रालय नव्हे तर हे मनी मंत्रालय आहे,’ असे म्हणत सिरसाठ यांनी नोटा उधळल्या.
जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वीच तीन अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यातच हा प्रकार घडला. त्यामुळे जिल्हा परिषदेत याची चर्चा दिवसभर रंगली होती. जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत रिक्त जागांपैकी १० टक्के जागा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. सेवाज्येष्ठतेनुसार त्या भरल्या जातात.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे म्हणाले, ‘‘२०२१-२२ मध्ये दहा टक्के जागांवरील नोकर भरती झाली होती, त्यात अन्याय झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले होते. सध्या भरती सुरू आहे. नियम डावलून भरती करता येत नाही. मात्र अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे.’’
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Heatwave: मुंबईचं तापमान ४० अंशांवर का पोहोचलं? तज्ज्ञांनी कारणच सांगितलं; मोठा खुलासा आला समोर

Horoscope News : उद्या 12 मार्चपासून 'या' 4 राशींना लाभेल नशीबाची पूर्ण साथ; अडकलेले पैसे येतील परत, अचानक मिळेल मोठी खुशखबर

IPL 2026 Schedule: परंपरेला तडा! RCB vs CSK हे आयपीएल २०२६च्या पहिल्याच सामन्यात भिडण्याचा अंदाज; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

Latest Marathi News Live Update : चाकण औद्योगिक वसाहतीवरती गॅसच्या तुटवड्यामुळे मोठा परिणाम, 30% कंपन्या या ठप्प होण्याच्या मार्गावर

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रस्त्यावर पार्किंगसाठी ऑड-ईवन नियम लागू; मुंबई ट्रॅफिक पोलिसांचा मोठा निर्णय, काय बदल होणार?

SCROLL FOR NEXT