पुणे

दळवी यांनी स्त्रीवादी लेखकाची भूमिका बजावली

CD

पुणे, ता. २५ : ‘जयवंत दळवी आयुष्यात कधीही माणसात रमले नाहीत. लेखनातून मात्र ते कायम माणसातच रमलेले दिसतात. ढोल न पिटता स्त्रीवादी लेखकाची भूमिका जयवंत दळवी यांनी उत्तम रीतीने पार पाडली,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांनी केले.
जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‌‘कॅलिडोस्कोप : जयवंत दळवी‌’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन गिरीश दळवी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी मोने बोलत होते. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘पुणेकरांची गर्दी पाहता जयवंत दळवी यांची लोकप्रियता आजही टिकून असल्याचे लक्षात येते,’ अशी टिपणीही त्यांनी केली.
याप्रसंगी ज्येष्ठ कवी-वात्रटिकाकार रामदास फुटाणे, सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या जान्हवी जानकर, ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस, अभिनेते शैलेश दातार, ‘संवाद, पुणे’ चे अध्यक्ष सुनील महाजन, निकिता मोघे, सतीश जकातदार, राजेश दामले उपस्थित होते. यावेळी नाटक, चित्रपटातील दृश्ये, सशक्त अभिवाचनातून जयवंत दळवी यांचे समग्र दर्शन घडले.
रेखा इनामदार-साने, प्रसाद ओक, शरद पोंक्षे, विजया मेहता, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे जयवंत दळवी यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. ‌‘बॅरिस्टर‌‌’, ‌‘नातीगोती‌’, ‌‘सूर्यास्त‌’ या नाटकांसह ‌‘चक्र‌’, ‌‘रावसाहेब‌’, ‌‘महानंदा‌’, ‌‘उत्तरायण‌’, ‌‘पुढचं पाऊल‌’ चित्रपटांची झलक यानिमित्ताने पाहायला मिळाली. अभिवाचन कार्यक्रमात अभिनेत्री स्वाती चिटणीस (नातीगोती), शैलेश दातार (स्वगत), राजेश दामले (मोहिनी दिवाकर), अभिनेते संजय मोने (ठणठणपाळ) यांचा सहभाग होता.
जयवंत दळवी यांच्या नाट्यकलाकृती, त्यांच्या प्रत्यक्ष भेटी याविषयीच्या आठवणींना मोने यांनी उजाळा दिला. कार्यक्रमाची निर्मिती ‘‌संवाद, पुणे‌’चे सुनील महाजन यांची तर संहिता लेखन सतीश जकातदार यांचे होते. संयोजन निकिता मोघे यांनी केले.
---
जयवंत दळवी यांनी व्याकरणातील सगळे रस लेखनात वापरले. त्यातील रौद्र, बीभत्स, शृंगार, क्रोध असे अनेक टोकाचे रस वापरताना देखील त्यांचा कधीही तोल गेला नाही.
- संजय मोने, ज्येष्ठ अभिनेते
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Khamenei: खामेनेई जिवंत? परराष्ट्रमंत्र्यांच्या दाव्याने जगभरात खळबळ; अजूनही पार्थिवावर अंत्यसंस्कार का झाले नाहीत?

Kannad Politics : कन्नडमध्ये काँग्रेसला मोठे खिंडार; डॉ. तृप्ती दिलीपसिंग राजपूत यांचा भाजपात प्रवेश

Finn Allen Century: १८ चेंडूंत ८८ धावा! फिन अ‍ॅलनचा T20 World Cup स्पर्धेत वर्ल्ड रेकॉर्ड; ख्रिस गेलचा विक्रम मोडलाच, शिवाय नोंदवले ५ मोठे पराक्रम, आफ्रिकेला बेक्कार झोडला...

Lakhandur News : चोरीचा गुन्हा उघडकीस आल्याने बदनामीच्या भीतीपोटी मुलीने संपविले जीवन

Murud Crime : मुरुड येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तिघांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT