पुणे

खाणपट्टाधारकांनी सर्व परवानग्या घेऊनच उत्खनन करावे : जितेंद्र डूडी

CD

पुणे, ता. २७ : तात्पुरते अथवा कायमस्वरूपी क्रशर आणि खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानग्या घेऊनच उत्खनन करावे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व संबंधित विभागांकडून ना - हरकत प्रमाणपत्र घेऊन परवानगीकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अडचणींबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या वेळी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुयोग जगताप, जिल्हा क्रशर खाणपट्टाधारक संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांच्यासह जिल्ह्यातील क्रशर खाणपट्टाधारक उपस्थित होते.

क्रशर आणि खाणपट्टाधारकांच्या समस्या जाणून घेऊन डुडी म्हणाले, ‘‘क्रशर आणि खाणपट्टा परवानगीकरिता लागणाऱ्या पर्यावरण ना-हरकत प्रमाणपत्राकरिता क्रशर आणि खाणपट्टाधारकांना परवानगी देण्याबाबत पर्यावरण विभागाच्या सचिवांना विनंती करण्यात येईल. क्रशर खाणपट्टाधारकांनी आपल्या वाहनांवर ‘जीपीएस’ लावून इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिट पासेस (ईटीपी) ठेवावे. आपापल्या खाणपट्ट्याची भूमी अभिलेख विभागाद्वारे मोजणी करून घ्यावी. खाणपट्ट्यात केलेले उत्खनन आणि त्याकरिता भरलेल्या शुल्काचा ताळमेळ संबंधित तहसीलदारांकडून तपासून करून घ्यावा, तसेच जिल्ह्यात पारदर्शक पद्धतीने कामकाज करण्यावर प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे नियमांचे सर्वांनी पालन करावे. आपल्या परिसरात बेकायदा कामकाज होत असल्यास प्रशासनास कळवावे.’’

कंद यांनी क्रशर, खाणपट्टाधारकांच्या अडचणींबाबत सूचना केल्या. नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Elections: जागा १, पण ७५ दावेदार! राष्ट्रवादीत तिकीटासाठी महाभारत; निर्णय कधी? निकष सांगत पक्षश्रेष्टींनी वेळच सांगितली

Mysore Sandal Record Turnover : 110 वर्षांची परंपरा अन् 2000 कोटींची झेप! 'म्हैसूर सँडल'ने रचला इतिहास; नफ्याचा आकडा वाचून थक्क व्हाल

Jalna News: मंठा शहरातील सुगंधानगरात दुर्गंधी!; घंटागाडी फिरकेना; नाल्या कचऱ्याने तुडुंब, डासांचाही प्रादुर्भाव

Jalna News: रुंदीकरणानंतर हरवली सिल्लोड रस्त्याची हिरवळ; वृक्षलागवड टाळून कंत्राटदाराकडून विश्वासघात, सावलीचा रस्ता बनला ‘काँक्रीट पट्टा’

Wedding Special: साडीऐवजी ३०० वऱ्हाडींना ‘ज्ञानेश्वरी’चा आहेर; कदम परिवाराचा आदर्श, विठ्ठलवाडीतील विवाह सोहळ्यात वाचन संस्कृतीचा संदेश..

SCROLL FOR NEXT