पुणे

वार घट्ट रुजलेल्या दोन महिलांची सुखरूप प्रसूती

CD

पुणे, ता. २७ : तीन सिझेरियन प्रसूती, तीन गर्भपातांनंतर सातव्‍यांदा गर्भवती असलेल्‍या आणि गर्भाशयात बाळाची वार (प्‍लेसेंटा) घट्ट रुजलेल्या महिलेवर ससून रुग्‍णालयात सिझेरियन शस्त्रक्रिया करण्‍यात आली, तर रक्तस्राव रोखण्‍यासाठी तिचे गर्भाशयदेखील काढावे लागले. याच प्रकारची समस्‍या असलेल्‍या दोन वेळा सिझेरियन प्रसूती आणि तीन वेळा गर्भपात झालेल्‍या महिलेचीदेखील सिझेरियन प्रसूती करून तिचेही गर्भाशय काढावे लागले.
या दोन्‍ही आव्‍हानात्‍मक शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात ससून रुग्‍णालयात झाल्‍या. त्‍यामुळे त्‍यांचा जीव वाचू शकला. स्‍त्रीरोग व प्रसूती विभाग, इंटरव्‍हेंशनल रेडिओलॉजी विभाग, भूलतज्‍ज्ञ विभाग, अतिदक्षता विभाग या सर्व विभागांच्‍या मदतीने या शस्त्रक्रिया झाल्‍या.
वैद्यकीय भाषेत या समस्‍येला ‘प्लेसेंटा परक्रेटा’ असे म्‍हणतात. ज्‍यांच्या आधीच प्रसूती झाल्‍या आहेत, गर्भपात झाले आहेत, त्‍यांच्‍यात ही समस्‍या दिसून येते. यात गर्भाशयात बाळाची वार ही गर्भाशयाच्या भिंतीत रुतून बसते. इतकेच नव्‍हे, तर गर्भाशयाच्‍या बाहेर येऊन इतर अवयवांमध्ये चिकटू शकते. यातील पहिल्‍या २५ वर्षीय महिलेला दाखल केल्‍यावर अचानक रक्तस्राव सुरू झाला. एमआरआय तपासणीत तिची ही समस्‍या आधीच डॉक्‍टरांना कळली होती. त्‍यावेळी स्‍त्रीरोग व प्रसूती विभागाच्‍या प्राध्‍यापक डॉ. शिल्‍पा नाईक यांनी त्‍या महिलेची सिझेरियन प्रसूती मध्‍यरात्री करण्‍याचा निर्णय घेतला. कारण, अशा समस्‍येत तिचा रक्तस्राव थांबविणे अशक्‍य असते आणि रक्तस्राव होऊन मृत्‍यू ओढवतो. त्‍यावेळी तिची सिझेरियन प्रसूती करून रक्तस्राव रोखण्‍यासाठी गर्भपिशवीही काढावी लागली. दुसऱ्या प्रकरणात जेजुरीच्या २९ वर्षीय गर्भवती महिलेची वार तर तिच्‍या मूत्राशयाला चिकटली होती. तिचीही अशीच सिझेरियन शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढावे लागले.
दरम्यान, या शस्त्रक्रिया डॉ. संजयकुमार तांबे यांच्‍या मार्गदर्शनाखाली डॉ. शिल्‍पा नाईक, इंटरव्‍हेंशनल रेडिओलॉजी विभागातील डॉ. किरण नाईकनवरे, सर्जन डॉ. सरफराज पठाण, अतिदक्षता विभागातील डॉ. सुषमा तांदळे, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. कीर्ती कुंडलवाल यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ज यांनी केल्या. अधिष्‍ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी पथकाचे अभिनंदन केले.

अत्‍याधुनिक तंत्राचा वापर...
सिझेरियन प्रसूतीच्‍या वेळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. तो रोखण्‍यासाठी इंटरव्‍हेंशनल रेडिओलॉजी विभागातील डॉक्‍टरांनी कमरेच्‍या ठिकाणी असलेली आणि गर्भाशयासह शरीराच्‍या खालच्‍या भागाला रक्‍तपुरवठा करणाऱ्या मोठ्या रक्‍तवाहिनीत फुगा सोडून तो काही काळ थांबविण्‍यात आला होता.

ज्‍या महिलांची प्रसूती किंवा वारंवार गर्भपात होतो, त्‍यांची गर्भपिशवी पातळ होऊन ही समस्‍या उद्‌भवते. त्‍यामुळे त्‍यांची गर्भपिशवी काढण्‍याशिवाय गत्‍यंतर नसते. या दोन्‍ही महिलांची सर्व विभागाने मिळून प्रसूती केली. अलीकडील काळात अशा प्रकारच्‍या रुग्‍णांची संख्‍या वाढत आहे.
- डॉ. शिल्‍पा नाईक, प्राध्‍यापक, स्‍त्रीरोग व प्रसूती विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT