पुणे

पुणे शहरातील वाहतूक शिस्तीचा नवा अध्याय

CD

पुणे, ता. १६ : शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी व शिस्तबद्ध करण्यासाठी ‘पुणे वाहतूक पोलिस अकादमी’ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकारातून आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात आला. या प्रशिक्षणात कायदे, प्राथमिक उपचार, ई-चलन, संवाद कौशल्य, ग्रीन कॉरिडॉर आदी महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश होता.

या १८ दिवसांच्या उपक्रमात वाहतूक शाखेतील ६३ अधिकारी व एक हजार ४५ पोलिस अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रमुख मार्गदर्शकांमध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह सुरेश गोखले, ऊर्मिला दीक्षित, मेधा कदम, अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, अशोक शिंदे, महादेव गावडे, विजय पळसुले, सुरेंद्र देशमुख, डॉ. श्याम गायकवाड, अमित गोंजारी यांचा समावेश होता.

या उपक्रमासाठी वीकफिल्ड फूड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी मल्होत्रा, टॉप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाउंडेशनचे अजय अगरवाल, ‘एलिफंट कनेक्ट’च्या मंजिरी गोखले आणि ‘टीएमसीएफ’चे संचालक श्रीकांत पाटील यांनी सहकार्य केले.

प्रशिक्षण उपक्रमाचे संयोजन पोलिस उपायुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलिस निरीक्षक (नियोजन) सुनील गवळी, पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, रुणाल मुल्ला, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत रघतवान, पोलिस हवालदार देविदास पाटील आणि पोलिस अंमलदार मल्हारी खडतरे यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

प्रशिक्षणातील समाविष्ट बाबी :
- सॉफ्ट स्किल्स व मानसोपचार प्रशिक्षण
- सौजन्यशील वर्तन व संवाद कौशल्य वृद्धिंगत करणे
- मोटार वाहन कायदा व वाहतूक नियमन
- ग्रीन कॉरिडॉर व अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी कॅन्व्हॉय व्यवस्थापन
- सीपीआर व प्राथमिक वैद्यकीय मदत
- ई-चलन प्रणालीचे प्रात्यक्षिक
- पोलिसांकडून नागरिकांशी व्यवहार आणि जबाबदारी
------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT