पुणे

भालबा केळकर नाटिका स्पर्धा शनिवारपासून

CD

पुणे, ता. ७ ः महाराष्ट्रीय कलोपासक संस्था आणि नाट्य संस्कार कला अकादमी यांच्यातर्फे आयोजित भालबा केळकर नाटिका स्पर्धा शनिवार (ता. ११) आणि रविवारी (ता. १२) होणार आहे. तर महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेतर्फे आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा १५ ते २१ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या दोन्ही स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होणार असून, दोन्ही स्पर्धांमध्ये वीस शाळांनी सहभाग घेतला आहे. ५ ते १० वयोगटातील मुलांसाठी भालबा केळकर नाटिका स्पर्धा, तर इयत्ता पाचवी ते दहावीतील मुलांसाठी राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धा घेण्यात येते.

‘कहाणी वन्दे मातरम्‌‍‌’ पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी
पुणे, ता. ७ ः लेखक-चित्रकार मिलिंद सबनीस लिखित ‌‘कहाणी वन्दे मातरम्‌‍‌’ची या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरुवारी (ता. ९) आयोजित करण्यात आला आहे. ‘वंदे मातरम्’‌‍ या गीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवार पेठेतील आबासाहेब अत्रे दिन प्रशालेतील बालसाहित्यकार इंदिरा अत्रे वाचन कक्ष येथे दुपारी १२ वाजता हा कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक प्रसाद भडसावळे यांनी दिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, लेखक अभिजित जोग, चित्रकार चंद्रशेखर जोशी, मिलिंद सबनीस याप्रसंगी उपस्थित असतील.

‘शंकर पुणतांबेकर यांच्या निवडक कथा’ पुस्तकाचे गुरुवारी प्रकाशन
पुणे, ता. ७ ः श्रीधर दीक्षित यांनी अनुवादित केलेल्या ‘शंकर पुणतांबेकर यांच्या निवडक कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी (ता. ९) होणार आहे. नारायण पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा येथे दुपारी चार वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते होणार असून, प्रा. डॉ. नीला बोरवणकर याप्रसंगी उपस्थित असतील.

‘मधु मागसि माझ्या’ कार्यक्रम शुक्रवारी
पुणे, ता. ७ ः कविवर्य भा. रा. तांबे यांच्या १५१ व्या जन्मवर्षानिमित्त तांबे कुटुंबीयांतर्फे शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी ४.३० वाजता टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृहात ‘मधु मागसि माझ्या’ या आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भा. रा. तांबे यांचे नातू शिरीष तांबे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्त्या म्हणून समीक्षक-कवयित्री प्रा. नीलिमा गुंडी उपस्थित राहणार असून, कवी व संत साहित्यिक वि. ग. सातपुते हे अध्यक्षस्थानी असतील. त्यानंतर सुधीर मोघे प्रस्तुत ‘स्मरण राजकवींचे’ हा भा. रा. तांबे यांच्या काव्य-गीतांवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच, भा. रा. तांबे यांच्या १५१ व्या जन्मवर्षानिमित्त वर्षभरात राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT