पुणे, ता. ७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहासाठी ऑनलाइन अर्ज केला नाही, अशा विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
आता दिलेली मुदतवाढ अंतिम असून पुन्हा मुदतवाढ देणार नसल्याचे समाजकल्याण विभागाने सांगितले. उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले तसेच नव्याने या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्जांसाठी मुदतवाढ दिली असल्याचे समाज कल्याण सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.