पुणे

बाहेरच्यांना पायघड्या; एकनिष्ठांवर गंडांतर ?

CD

ब्रिजमोहन पाटील, सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाच माजी नगरसेवकांनी आज (ता. ७) मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. या पाच माजी नगरसेवकांमुळे भाजप आणखी मजबूत झाल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. मात्र, या नगरसेवकांच्या विरोधात ज्यांनी २०१७ मध्ये महापालिकेची निवडणूक लढवली होती, त्यात काहींचा निसटता पराभव झाला होता. अशा भाजपच्या कार्यकर्त्यांच्या उमेदवारीवर मात्र गंडांतर आल्याने भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर आता पुणे महापालिकेच्या निवडणुकीचे वेध राजकीय पक्षांना लागले आहेत. २०१७ मध्ये शिवसेनेचे १० नगरसेवक निवडून आले त्यातील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची आल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर या पाच माजी नगरसेवकांनी आज प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार सुनील कांबळे या वेळी उपस्थित होते.
भाजपने महापालिकेसाठी या माजी नगरसेवकांचे स्वागत केले असले तरी त्यांच्या प्रभागात गेले अनेक वर्षे काम करणाऱ्या व भाजपमधून इच्छुक असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केले, महापालिकेची तयारी सुरू असताना पक्षात अन्य पक्षातील माजी नगरसेवकांचा प्रवेश केला जात असल्याने भविष्यात उमेदवारी मिळविण्यासाठीची स्पर्धा तीव्र होणार आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे या पाच माजी नगरसेवकांपैकी चार जणांची थेट लढत भाजपच्या उमेदवारासोबत झाली होती. यातील बाळा ओसवाल हे १४८१ मतांनी विजयी झाले, संगीता ठोसर या केवळ १८१, प्राची आल्हाट या ७७५, विशाल धनवडे फक्त २६६ मतांनी विजयी झाले, तर पल्लवी जावळे यांनी अपक्ष उमेदवाराचा २७६९ मतांनी पराभव केला. त्यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार रिंगणात नव्हता. तेथेही आता भाजपमधून अनेक इच्छुक तयार झालेले असताना जावळे यांच्या प्रवेशाने कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत.
-----------
पुण्यातील माजी नगरसेवकांचा हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण आहे. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा विचार सोडला. मात्र, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देणे पसंत नव्हते. म्हणूनच हिंदुत्वासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या या सर्वांचा योग्य तो सन्मान राखला जाईल.
- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप
------------------------
अशी होती २०१७ मधील स्थिती
प्रभाग क्रमांक ३७ क ः अप्पर-इंदिरानगर
बाळा ओसवाल - ९८२०- शिवसेना
गौरव घुले - ८३३९ - भाजप
ओसवाल यांचे मताधिक्य - १४८१

प्रभाग क्रमांक ४१ ब कोंढवा बु.-येवलेवाडी
संगीत ठोसर - १०९५२ - शिवसेना
सुवर्णा मारकड - १०७७१ - भाजप
ठोसर यांचे मताधिक्य - १८१

प्रभाग क्रमांक २६ अ महंमदवाडी-कौसरबाग
प्राची आल्हाट - ८६२४ - शिवसेना
अश्‍विनी सूर्यवंशी - ७८४९- भाजप
अल्हाट यांचे मताधिक्य - ७७५

प्रभाग क्रमांक १७ ड रास्ता पेठ-रविवार पेठ
विशाल धनवडे - १२४२३- शिवसेना
अरविंद कोठारी - १२१५७ - भाजप
धनवडे यांचे मताधिक्य - २६६

प्रभाग क्रमांक १६ अ कसबा पेठ-सोमवार पेठ
पल्लवी जावळे - ११७७६- शिवसेना
छाया वारभुवन - ९००७ - अपक्ष
जावळे यांचे मताधिक्य - २७६९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajakt Tanpure: शरद पवार गटाचा किल्ला ढासळणार, राष्ट्रवादीचा पहिला आमदार भाजपच्या वाटेवर; राजकारण पालटणार

Horoscope : जूनच्या सुरुवातीलाच बदलणार 'या' 3 राशींचे नशीब; नोकरी-धंद्यात मोठी कलाटणी, बनतोय धनलाभ योग

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

SCROLL FOR NEXT