पुणे, ता. ७ : मुळशी तालुक्यातील रावडे गावातील शांत आणि निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेल्या संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल (एसजीआयएस) या निवासी (बोर्डिंग) शाळेची २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल ५० एकर परिसरात असलेली ही शाळा शहराच्या गोंगाटापासून दूर, शांततापूर्ण वातावरणात शिक्षण व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांना उत्तम संधी उपलब्ध करून देत आहे.
संस्थापक संजय घोडावत यांनी दूरदृष्टी ठेवून या शाळेची निर्मिती केली आहे. शाळेचे सचिव श्रेणिक घोडावत आणि ट्रस्टी विनायक भोसले यांच्या पुढाकाराने ही शाळा जागतिक दृष्टिकोन बाळगून स्थानिक मूल्यांशी जोडलेली आहे. शिक्षण क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ संचालिका सस्मिता मोहंती यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसजीआयएस’ने गुणवत्तापूर्ण निवासी शाळांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. प्राचार्य डॉ. पौरुषस्प करकरिया यांच्या नेतृत्वाखाली ‘एसजीआयएस’चा मुख्य उद्देश समाजासाठी कार्य करणारे व योगदान देणारे आदर्श नागरिक तयार करणे हा आहे.
या शाळेमध्ये केंब्रिज (सीएआयई), इंटरनॅशनल बॅकलॉरिएट (आयबी- कॅन्डीडेसी) आणि अमेरिकन डिप्लोमा अभ्यासक्रम यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमांचा समावेश केला आहे. अल्पावधीतच ‘एसजीआयएस’ने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्यात २०२४ मध्ये केंब्रिज विद्यापीठाकडून मिळालेला ‘ॲकॅडमिक एक्सलन्स अॅवॉर्ड’चा समावेश आहे. नवीन प्रवेशासाठी www.sgispune.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल.
शाळेची वैशिष्ट्ये
- स्टेम व रोबोटिक्स लॅबची सुविधा
- स्वीमिंग पूल, घोडेस्वारी, रायफल शूटिंग खेळांची सुविधा
- विषयाधारित अध्यापन आणि नाट्यप्रयोग, प्रदर्शन, शैक्षणिक सहली, क्षेत्रभेट, ट्रेकिंगचे आयोजन
- आंतरराष्ट्रीय विद्यार्थी देवाण-घेवाण कार्यक्रम
- जगभरातील शिक्षणतज्ज्ञांसोबत संवाद कार्यक्रम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.