पुणे, ता. ७ ः ‘काही अधिकारी कामाच्या वेळेत नागरिकांना भेटायचे सोडून ॲन्टीचेंबरमध्ये सहकाऱ्यांशी गप्पा मारत बसतात, असे प्रकार टाळा, नागरिकांना भेटा, त्यांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवा,’ अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
पुणे महापालिकेतील सर्व विभागप्रमुख, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांसाठी प्रशिक्षणवर्ग आयोजित केले होते. त्या वेळी महापालिका आयुक्तांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गाच्या पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधिक्षकांशी दृकश्राव्यमाध्यमाद्वारे संवाद साधला. यामध्ये सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन सुकर व्हावे यासाठी सात कृती कलमी कार्यक्रम निश्चित केला आहे. याची माहिती आयुक्तांनी या प्रशिक्षणवर्गात मार्गदर्शन करताना दिली.
आयुक्त म्हणाले, ‘‘नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, लोकशाही दिनात किमान ५० अर्ज आले पाहिजेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता असली पाहिजे, वातावरण अल्हाददायक असले पाहिजे. काही अधिकारी नागरिकांना न भेटता ॲन्टीचेंबरमध्ये बसून गप्पा मारत असतात, अशा तक्रारी आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी असे वागू नये, नागरिकांशी भेटावे, त्यांच्याशी व्यवस्थित बोलून प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा. कामाच्या ठिकाणी भेट देण्याचे वेळापत्रक ठरवून त्याचे पालन करा, आपल्या विभागाशी संबंधित असणाऱ्या संस्था, व्यक्तींसोबत चर्चा करून प्रश्न सोडविण्याकडे लक्ष द्यावे.’’
पुणे महापालिकेचे अमृतमहोत्सवी वर्ष सुरू होणार आहे. यासाठी अधिकाऱ्यांनी कर्मयोगी प्रशिक्षण देत आहोत. गेल्या वर्षीपेक्षा २०२५ मध्ये नागरिकांप्रती चांगले काम करूयात, असेही आयुक्तांनी या वेळी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.