पुणे, ता. ७ : ज्येष्ठ महिलेची शुश्रूषा करण्यासाठी ठेवलेल्या केअरटेकर महिलेनेच बंगल्यातून २५ तोळे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून आठ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४६ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे.
गायत्री सुनील हातेकर (वय २४, रा. चव्हाणनगर, धनकवडी) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत एका महिलेने १ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी महिलेच्या आई बिबवेवाडीतील महेश सोसायटीजवळ एका बंगल्यात राहतात. त्यांच्या बंगल्यातून सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान २५ तोळे दागिने चोरीस गेले होते. पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान, आरोपी महिला ही फिर्यादीच्या घरी आईची शुश्रुषा करण्यासाठी येत होती. तिने संधी साधून कपाटातून दागिने चोरल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक शशांक जाधव यांना मिळाली. पोलिसांनी केअरटेकर महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी साडेआठ लाख रुपयांची सोन्याची लगड जप्त करण्यात आली.
वरिष्ठ निरीक्षक शंकर साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहाय्यक निरीक्षक संजय निकुंभ, उपनिरीक्षक शशांक जाधव, आशिष गायकवाड, राहुल शेलार, नितीन कातुर्डे, गोकुळा काटकर यांनी ही कारवाई केली.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.