पुणे

आयटी कंपनीतील तरुणीवर सहकाऱ्याकडूनच हत्याराने वार

CD

पुणे, ता. ७ : एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील तरुणीवर तिच्या सहकाऱ्यानेच धारदार हत्याराने वार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी येरवडा परिसरात घडली. या हल्ल्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली आहे. येरवडा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, पुणे) या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मूळची कराड येथील आहे. ती येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील कॉल सेंटरमध्ये कामास आहे. तिचा याच कंपनीतील सहकारी कृष्णा कनोजा याच्यासमवेत काही कारणावरून वाद झाला होता. ती मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये आली होती. त्यावेळी कनोजाने तिला पार्किंगमध्ये गाठले. त्याने तरुणीच्या उजव्या कोपऱ्यावर धारदार हत्याराने वार केले. त्यात मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हल्ल्याचे कारण अस्पष्ट
शुभदा आणि कृष्णा हे दोघे कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाउंटंट म्हणून काम करतात. त्यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यातूनच त्याने हे कृत्य केले असावे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

Chandoli Dam Tourists : चांदोली धरणावर दारू पिऊन धिंगाणा घालताय? सावधान! पोलिस, धरण प्रशासन ॲक्शन मोडवर; मद्यधुंद पर्यटकांवर अंकुश

Ambenali Ghat Accident : महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटात भीषण दुर्घटना ! स्कॉर्पियो ५०० फूट खोल दरीत कोसळली, ८ जणांचा जागीच मृत्यू

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

SCROLL FOR NEXT